केंद्र सरकारने ईपीएफओला निर्देश दिले आहेत की, PF क्लेम फेटाळताना सर्व उणिवा एकाच वेळी अर्जदाराला सांगाव्यात, जेणेकरून दावा पुन्हा पुन्हा भरावा लागणार नाही आणि अर्जदाराला अडचणीतून वाचवता येईल.
पहा आणखी काय सांगितले सरकारने
तसेच ग्राहकांना त्यांचे दावे लवकर मिळावेत, त्याचबरोबर कामगार मंत्रालयाने ईपीएफओला दिलेल्या निर्देशांनुसार जर अर्ज करणाऱ्या सदस्याचे तपशील डेटा बेसमध्ये जुळत असतील तर त्यांचे दावे इतर कारणांमुळे नाकारले जाऊ नयेत असे सरकारने सांगितले.
आणि ईपीएफओच्या नियमांनुसार, कर्मचारी निवृत्त असल्यास किंवा सलग दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार राहिल्यास PF मध्ये जमा केलेली रक्कम काढता येते. असेही सरकारने स्पष्ट केले आहे.