ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

स्व राकेश निर्मल शाहा यांच्या पाचव्या पुण्यस्मरण सुंदरनगर येथे रक्तदान शिबिर 

मुलचेरा:

स्व राकेश निर्मल शाहा मित्र परिवार यांच्या तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र सुंदरनगर येथे स्व राकेश निर्मल शाहा यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त 5 मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

     या रक्तदान शिबिरात एकूण 40 रक्तदातानी रक्तदान केले यात 30 पुरुष 10 महिला सहभाग नोंदविले.

या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रवि शहा, राजकीय पदाधिकारी,नेताजी सुभाषचंद्र विज्ञान शाळेचे मुख्याध्यापक निकुले सर, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक,स्व राकेश निर्मल शाहा मित्र परिवार आदी उपस्थितीत होते.