ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

ब्रेकिंग ! – ट्रायचा मोठा निर्णय , आता मोबाईल नंबर ऐवजी दिसणार फोन करणाऱ्यांचे नाव

तुम्हाला माहिती असेल , आतापर्यंत फोन करणाऱ्यांचे मोबाईल स्क्रीनवर दिसत होते – मात्र आता TRAI म्हणजे Telecom Regulatory Authority of India ने याबाबत मोठा निर्णय घेतला –

 त्यामुळे आता मोबाईल नंबर ऐवजी फोन करणाऱ्यांचे नाव मोबाईल स्क्रीनवर दिसणार – असे TRAI ने म्हटले आहे

 पहा काय सांगितले TRAI ने

ट्रायच्या नियमानुसार, टेलिकॉम ऑपरेटर यांच्याकडे ग्राहकांचे नाव, पत्ते (KYC) असतात. ग्राहकही टेलिकॉम ऑपरेटर्सना सिम घेण्याच्या वेळी वैयक्तिक माहिती देत ​​असतात.

 या माहितीच्या आधारे ग्राहाकांना फोन आल्यावर तो कोणाचा आहे ते कळणार आहे. महत्वाचे म्हणजे ग्राहकांना ही सेवा केवळ टेलिकॉम कंपनीकडून प्राप्त झालेल्या केवायसी डेटाद्वारेच मिळेल.

 त्यामुळे कॉल करणाऱ्याची माहिती खरी आहे की नाही, याची पडताळणी करणे शक्य होणार आहे. याशिवाय तुम्ही कोणत्याही स्पॅम कॉलची तक्रार सहजपणे करू शकता – असेही TRAI ने म्हटले आहे