ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ब्रेकींग: शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी नुकसान भरपाई मिळणार, कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा..

 शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असतो. उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा या ऋतूंमध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी! अशा नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य शासन देखील वेळोवेळी मदत करण्यासाठी पाऊले उचलून आर्थिक मदत देत आहे. आता यासंबंधी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठी घोषणा केली आहे.

 कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या माहीतीनुसार,* “अनेक संकटांवर मात करून शेती पिकविणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून लवकरच मदत मिळणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळणार असून नुकसानग्रस्त कोणताही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही. यासोबतच पीक विम्याचे पैसे लवकरच मिळतील यासाठी शासन कटिबद्ध आहे”, असे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

 “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार, यावरून विरोधकांकडून सतत निशाणा साधला जायचा. आता अनेक नैसर्गिक संकटांमधून बाहेर निघण्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे 12 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येईल, यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. आता येत्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप होणार आहे”, असं कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.