ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

ब्रेकींग: नवीन सिम कार्ड घेताय? दूरसंचार विभागाने जारी केला नवा नियम..

देशभरात असंख्य ग्राहक मोबाईल वापरताना सिम कार्ड वापरतच असतात. मोबाईलवर बोलण्यासाठी मनोरंजनासाठी आणि कामासाठी गरज पडते पण सर्वाधिक गरज ही उत्कृष्ट नेटवर्क देणाऱ्या सिम कार्डची असते. तसं झालं नाही तर मोबाईलधारक मग नवीन सिम खरेदी करतात. जर तुम्ही जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, बीएसएनएल, एमटीएनएल युजर असाल तर ही बातमी सविस्तर वाचा..

आता मोबाईल धारकांसोबत होणाऱ्या सिमकार्ड फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता दूरसंचार विभागाने एक नवीन नियम आणला आहे. दूरसंचार विभागाने आणलेल्या या नवीन नियमाबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, ज्याने तुम्ही घेतलेल्या नवीन सिमचे सक्रिय झाल्यानंतरसुद्धा पुढील 24 तास इनकमिंग-आउटगोइंग कॉल्स आणि एसएमएसची सुविधा बंद राहू शकते.

दूरसंचार विभागाने आणला नवा नियम…

 मोबाईल सेवांचा वापर करण्यासाठी ग्राहक नवीन सिम कार्ड खरेदी करतात किंवा पोर्ट करतात. पण या दोन्ही परिस्थितीत आपल्याकडे नवीन सिम कार्ड येते. आता हे नवीन सिम कार्ड सध्या 3 ते 4 दिवसांत सुरू होते, असं म्हणतात. पण आता ते त्यानंतरही पुढील 24 तास म्हणजेच आणखी एक दिवस बंद राहणार आहे, असा दूरसंचार विभागाने नवीन नियम आणला आहे.

 नवीन सिम किंवा अपग्रेडसाठी विनंती केली गेली आहे किंवा नाही याची सिम सक्रिय झाल्यानंतर 24 तासांच्या आत ग्राहकांशी संपर्क करून पडताळणी केली जाईल. ग्राहकाने नवीन सिमची विनंती नाकारल्यास, नवीन सिम सक्रिय/सुरू केले जाणार नाही. आता दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार कंपन्यांना हा नियम लागू करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे.