अंतरराष्ट्रीय इतर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश निकाल राष्ट्रीय

BREAKING NEWS.! राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, खासदारकी पुन्हा मिळणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली-       देशाच्या राजकारणात या घडीला एक मोठी बातमी समोर आली असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा देत ; सूरत कोर्टानं सुनावलेल्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. राजकीय तज्ञांकडून एक प्रकारे हा मोदी सरकार’ला मोठा झटका मानला जात आहे. तर सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिल्याने, राहुल गांधी यांना त्यांची गेलेली खासदारकी पुन्हा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

न्यायमूर्ती गवई यांनी; राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हायकोर्टाने शिक्षा सुनावताना पूर्ण विचार केला नाही असं आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य योग्य नव्हतं, सार्वजनिक आयुष्यात बोलताना भान बाळगलं पाहिजे असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर, राहुल गांधी यांच्या विरोधात महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना अधिक शिक्षा सुनावण्याचे निकष काय आहेत. त्यांना कमी शिक्षा देखील दिली जाऊ शकते, असं म्हटलं. याशिवाय त्यांच्या मतदारसंघातील जनतेचा अधिकार देखील अबाधित राहिला असता, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्वागत करतांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे