सर्वसामान्य प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन आता घर बसल्या ट्रॅक करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या एमएसआरटीसी ॲपची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.
सध्या अनेक बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र सध्या या ॲपची सेवा केवळ अधिकारी, कर्मचारी यांच्या पुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे.
एसटीचे लोकेशन बरोबर मिळते की नाही याची दररोज तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये ज्या अडचणी निर्माण होत आहेत, त्या दूर करण्याचं काम सध्या सुरू आहे.
दरम्यान लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटीचं लोकेशन ट्रॅक करता येणार आहे. तसे याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू.