संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. 9 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने 31 जानेवारीला या अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. मुर्मू यांचे अभिभाषण यावेळी संसदेच्या केंद्रीय कक्षात न होता नवीन संसद भवनातील लोकसभेच्या सभागृहात होणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू यांचे यावेळी प्रथमच नवीन संसद भवनात आगमन होणार आहे.1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन् अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. यावर्षी लोकसभेची निवडणूक असल्यामुळे नियमित अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही. मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील हा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर नवीन सरकार जुुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनात नियमित अर्थसंकल्प सादर करेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारने उद्या सकाळी 11.30 वाजता संसद भवन परिसरातील ग्रंथालय इमारतीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. Budget session of Parliament अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरकारतर्फे केले जाणार आहे. यापूर्वीचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरले होते. सुरक्षाव्यवस्थेच्या उल्लंघनाची गंभीर घटनाही त्यात घडली होती. यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. त्याची परिणती दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षांच्या जवळपास दीडशे सदस्यांच्या निलंबनात झाली होती.
Related Articles
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली
“तडफदार नेतृत्व काळाने हिरावले” मुंबई, दि. ३ :- “नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, तसेच दिवंगत जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी-चिंचवडचा […]
जिल्हा हादरला! आरोग्य केंद्राच्या शिपायाचे पाच वर्षांच्या मुलीशी कुकर्म; एटापल्ली तालुक्यातील घटना
गडचिरोली : दारासमोर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी ही घृणास्पद घटना घडली. वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडितेची उपचाराअभावी हेळसांड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. […]
गडचिरोलीत स्टील हब ऑफ इंडिया होणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उच्च दर्जाचे खनिज असून या माध्यमातून आगामी काळात देशातील स्टील हब ऑफ इंडिया म्हणून नावलौकीकास येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी केले. पोलीस दलाच्या माध्यमातून आयोजित करण्यातपोलीस दलाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय गडचिरोली महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन […]