मुलचेरा: सध्या पावसाचे दिवस असून या दिवसात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. मात्र तरीदेखील अनेक जंतूंचा प्रादुर्भाव होत असल्याने अनेकांना संसर्गजन्य आजाराची लागण होते. अशातच मुलचेरा तालुक्यात लहान मुलांचे डोळे येण्याची साथ सुरु झाली आहे. अनेक शाळांमधील मुलांना याची बाधा झाल्याने शाळेतील विद्यार्थी उपस्थिती संख्या रोडावल्याचे चित्र आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत डोळ्यांच्या […]
गडचिरोली
आता प्रत्येक नागरीकांना मिळणार आरोग्य संरक्षण कवच: डॉ ललित मल्लिक वैधकीय अधिक्षक मुलचेरा
मुलचेरा:- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आता आरोग्य कवच प्राप्त होणार आहे. जाणून घ्या कशी आहे हि योजना राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र यापुढे […]
प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान अंतर्गत मिलिट जनजागृती अभियान
तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या नेतृत्वात तालुक्यातील गावा गावातील प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य बाबत जनजागृती तसेच पौष्टिक करून धान्याचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती देण्याकरता कार्यक्रम राबविण्यात येत असून यावेळी मोजा कोपरआली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांना कृषी सहायक प्रदीप मुंडे* यांनी पौष्टिक तृणधान्य लागवड पद्धत तसेच […]
अहेरी येथील दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा.राजे अंम्ब्रिशराव महाराज यांनी येल्ला (रेगुंठा) येथील शंकर नरसिंगेजी यांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत गडचिरोली- जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यातील स्थानिक येल्ला (रेगुंठा) येथील रहवासी असलेले शंकर नरसिंगेजी हे काही दिवसापासून गळ्यात फोडे झाल्याने या आजाराने ग्रस्त होते आणि त्यांना उपचारासाठी मंचिराल( तेलंगणा) येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी शास्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले आणि […]
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण
मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांच्या २०० कार्यकर्ते यांचा भाजप पक्ष प्रवेश मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते 206 शालेय विद्यार्थीना सायलक वाटप गडचिरोली- जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यात काल माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे दौऱ्यावर आले असता तेथील कार्यकर्ते व स्थानिक गावकऱ्यांनी त्यांचा मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात जंग्गी […]
सिंदेवाही व सावली ग्रामीण रूग्णालयासाठी 76 कोटींचा निधी मंजूर- माजी मंत्री व विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश
ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही व सावली तालुक्यातील ग्रामीण नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा ब्रम्हपुरी क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशनात सिंदेवाही व सावली येथील ग्रामीण रुग्णालयात आयसीयू बेड सह इतर मूलभूत तसेच अद्यावत आरोग्य सेवा मिळावी या उदांत हेतूने सभागृहात मागणी रेटून धरल्याने […]
आलापल्ली वासियांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड- मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश
अहेरी- कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश आले असून तालुक्यातील आलापल्ली वासीयांना आता मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आलापल्ली येथील ग्रामवासियांकडे मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रॉपर्टी कार्ड मिळावा यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. मात्र ते शक्य झाले नाही. धर्मराव बाबा आत्राम आमदार […]
ब्रेकिंग ! – आता रेल्वेप्रमाणे एसटी बसचेही करता येणार लोकेशन ट्रॅक – एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी
सर्वसामान्य प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन आता घर बसल्या ट्रॅक करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या एमएसआरटीसी ॲपची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. सध्या अनेक बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र सध्या या ॲपची सेवा केवळ अधिकारी, कर्मचारी यांच्या पुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. एसटीचे लोकेशन बरोबर मिळते की […]
शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोलीत येणार
शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी “शासन आपल्या दारी” उपक्रमातून 6.97 लक्ष नागरिकांना विविध योजना व सेवांचा लाभ वितरीत गडचिरोली, दि.06 : गडचिरोली जिल्हयात आत्तापर्यंत झालेल्या “शासन आपल्या दारी” उपक्रमातून 6.97 लक्ष नागरिकांना विविध योजना तसेच दाखले दिले आहेत. या उपक्रमातील जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी उपक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित […]
मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची – राष्ट्रपती मुर्मू
गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण गडचिरोली, दि. ५: देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले. गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभ व अडपल्ली येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारतीच्या कोनशिला समारंभास राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या […]