“हिवतापाला संपवू या : पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा” या संकल्पनेखाली आज जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून गडचिरोलीत विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिवताप निर्मूलनासाठी जनतेला सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने शहरातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे व जिल्हा शल्य चिकित्सक […]
गडचिरोली
महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा, लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद मंत्रालयात विशेष कक्ष, महाराष्ट्र सदनातूनही समन्वय मुंबई, दि. 24 : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य […]
मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘व्हॉट्सअप’वर उपलब्ध करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य शासनाच्या विविध सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मेटासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण प्रणाली व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आरोग्यविषयक सर्व योजनांसाठी एकच पोर्टल आणि अर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री सहायता निधीबाबत सर्व सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नागरिकांना सहज उपलब्ध […]
ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रम अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात नायब तहसिलदार निखील पाटील यांचाही गौरव राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2024-25 अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना राज्यस्तरावर पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना ग्रामसभा सक्षमीकरण उपक्रमासाठी विभाग स्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात […]
हृदयविकारासाठी सी.पी.आर प्रशिक्षणाची जनजागृती मोहीम
जीवनशैली, वाढता मानसिक तणाव आणि अयोग्य आहारामुळे हृदयविकाराचे प्रमाण शहरी तसेच ग्रामीण भागात वेगाने वाढत आहे. अचानक येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी सी.पी.आर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) हे एक अत्यावश्यक जीवनरक्षक कौशल्य ठरत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले. आपत्कालीन प्रसंगी रुग्णालयात पोहोचेपर्यंत प्रथमोपचार स्वरूपात सी.पी.आर देणे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी […]
देऊळगाव धान खरेदी केंद्र येथील धान खरेदी अपहारातील दोन आरोपींंस गडचिरोली पोलीसांनी केली अटक
सन 2023-24 व 2024-25 या दोन्ही वित्तीय वर्षात एकुण 3,96,65,965/- रुपयांचा झाला होता अपहार शेतकयांनी पिकविलेल्या शेतमालाला आधारभुत किंमत देण्याकरीता शासन विविध योजना राबवित असते. राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतकयांनी पिकविलेले धान विविध खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाते. खरेदी केलेल्या धानाची प्रादेशिक कार्यालय समिती स्तरावर मा. जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने नेमलेल्या […]
प्रलंबित घरकुलांसह पायाभूत सुविधांच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
प्रधान मंत्री जनजातीय महा न्याय अभियानाचा आढावा गडचिरोली, दि. १३ एप्रिल – प्रधानमंत्री जनजातीय महा न्याय अभियान (पीएम जनमन) अंतर्गत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज जिल्हास्तरीय आढावा घेतला. दूरदृष्टी प्रणालीद्वारे पार पडलेल्या या बैठकीत त्यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याचे निर्देश दिले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात 8321 […]
‘आपले सरकार’ पोर्टलच्या अद्ययावतीकरणामुळे १० ते १४ एप्रिल या काळात सेवांमध्ये तात्पुरती खंडितता
महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून १० एप्रिल २०२५ (गुरुवार) ते १४ एप्रिल २०२५ (सोमवार) दरम्यान ‘आपले सरकार’ पोर्टलवर नियोजित देखभाल आणि हार्डवेअर अद्ययावत करण्याचे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ वरील सर्व सेवा आणि प्रणाली काही काळासाठी अनुपलब्ध राहतील. दिनांक १० ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत बहुतांश दिवस सार्वजनिक सुट्ट्या […]
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत 450 जोडप्यांना २ कोटी २५ हजारांचे अर्थसहाय
गडचिरोली, दि. 8 : समाजातील जातिभेद व अस्पृश्यता निर्मूलनासाठी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 450 आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना प्रत्येकी 50,000 याप्रमाणे एकूण २ कोटी २५ हजारांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले आहे. या योजनेचे उद्दिष्ट समाजात समता, बंधुता आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे हे असून, आंतरजातीय विवाह करणाऱ्या […]
‘एमआयडीसी’ असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकासाला अधिक चालना देता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री […]