दिनांक 29.10.2022 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यांमध्ये सिरोंचा, मेडाराम, झिंगानुर परिसरात भुकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. तसेच दि.28.10.2022 रोजी चे रात्री 11.30 ते 12.00 वाजता चे दरम्यान अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, उमानुर, मरपल्ली, जोगनपुडा, तिमरम या गावांमध्ये भुकंपाचे सौम्य झटके जाणवले आहे. वरील दोन्हीही सिरोंचा व अहेरी तालुक्यात जाणवलेल्या भुकंपाचे झटक्यामुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी […]
गडचिरोली
आयुक्त, मानव विकास आयुक्तालय, औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली मानव विकास कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आढावा बैठक संपन्न
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात दि. 28.10.2022 रोजी नितीन पाटील आयुक्त, मानव विकास आयुक्तालय, औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली मानव विकास कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस संजय मीणा, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा मानव विकास समिती, गडचिरोली तसेच कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., गडचिरोली उपस्थित होते. […]
लोहखनिज प्रकल्पामुळे युवकांना रोजगार उपलब्ध होऊन विकासाला मिळणार चालना.
गडचिरोली जिल्ह्यातील महत्वाकांक्षी सुरजागड लोहखनिज प्रकल्पामूळे अनेक वर्षांपासून रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या येथील युवकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून कोनसरी येथे होत असलेल्या प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या हाताला आता काम मिळणार आहे. आतापर्यत गडचिरोली जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे,कारखाने नसल्याने जिल्ह्याचा औद्योगिक विकास रखडला होता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती असतानाही त्यावर आधारित प्रकल्प नसल्याने श्रीमंत जिल्ह्याच्या नशिबी […]
माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते गांधीनगर येथे क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आणि मूलचेरा येथे फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण
मूलचेरा:- स्थानिक मूलचेरा तालुक्यातील कालीनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गांधीनगर येथे क्रिकेट स्पर्धचं आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं,त्यावेळी ते म्हणाले या खेळाने माणूस स्वतःची प्रगती करू शकतो आपलं भविष्य बनवू शकतो आणि आपल्या क्षेत्राचं नाव उंचावर नेऊ […]
भामरागड मधील अतिदुर्गम भागात पोलीस जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी केली दिवाळी साजरी
भामरागड मधील अतिदुर्गम भागात पोलीस जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी केली दिवाळी साजरी गडचिरोली : गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री […]
मोहुर्ली येथे वीर बाबुराव शेडमाके यांची शहिद दिवस साजरा
मुलचेरा :- तालुक्यात मोहुर्ली येथे २१ऑक्टोबर रोजी वीर बाबुराव शेडमाके शहिद दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.विकास नैताम नगराध्यक्ष नगरपंचायत मुलचेरा कार्यक्रमाचे उदघाटन श्री तालांडे साहेब नायब तहसीलदार तहसील कार्यालय मुलचेरा यांच्या हस्ते करण्यात आला.प्रमुख पाहुणे दिनेश पेंदाम,श्री.कुळमेथे साहेब,श्री पवन आत्राम,प्रभाकर मडावी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.विकास नैताम नगराध्यक्ष नगरपंचायत मुलचेरा यांनी शहिद वीर […]
सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचना
गडचिरोली: सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचित करण्यात येते की, गडचिरोली जिल्हयातील खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्याठिकाणापासून कि.मी.प्रमाणे बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भांडे बाबतचा विहित नमुना तक्ता तयार करुन व त्याप्रमाणे येणारा प्रति आसन दर दर्शवून सदर खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिध्द करणे […]
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019- अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना
शेतकरी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन गडचिरोली,(जिमाका)दि.17: महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजना–2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेबाबत दि.29 जुलै 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सन 2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जा पैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत […]