जिल्ह्यात मेंढा लेखा ग्रामसभेपासून ऐतिहासिक वाटचालीस सुरूवात गडचिरोली : जिल्हयातील ग्रामसभांसाठी कौशल्य व क्षमता विकसनासंदर्भात कार्यक्रम हाती घेवून गौणवनोपजामधून त्यांच्या क्षमता व मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्यास सक्षम करणे या उद्देशाने प्रशासन आणि विविध ग्रामसभांमध्ये सामंजस्य करार होणार आहेत. याची ऐतिहासिक सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालयात आज लेखा मेंढा या ग्रामसभेपासून झाली. यावेळी जिल्हा परिवर्तन समितीचे अध्यक्ष तथा […]
गडचिरोली
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांसाठी पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना
गडचिरोली :- राज्यातील “धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित/ विना अनुदानित/कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना” अल्पसंख्याक विकास विभागाच्या शासन निर्णय, दि.७.१०.२०१५ अन्वये राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता अनुदान मिळवू इच्छिणा-या अल्पसंख्याक बहूल शासनमान्य खाजगी शाळा; […]
डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज अमंत्रित
गडचिरोली: राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी “डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना” शासन निर्णय दि. ११/१०/२०१३ अन्वये कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर योजने अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता अनुदान मिळवू इच्छिणा-या मदरसांनी त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालय, नियोजन भवन, गडचिरोली येथे दि. १८ फ्रेबुवारी, २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन […]
कृषी यांत्रिकीकरण उपभियान 2021-22 अंतर्गत कृषी कल्याण अभियान योजना कृषी औजारे बँक स्थापनेसाठी अर्ज आमंत्रित
गडचिरोली: कृषी यांत्रिकीकरण उपविभाग 2021-22 अंतर्गत कृषी कल्याण अभियान योजना अंतर्गत भाडे तत्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा पुरवठा साठी कृषी औजारे बँक स्थापना प्रति तालुका 2 या प्रमाणे 80 टक्के किंवा 8 लाख रुपये अनुदानावर राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जिल्हयास प्रति तालुका 2 या प्रमाणे लक्षांक प्राप्त झालेला आहे तरी लाभ घेण्यास इच्छुक शेतकरी […]
स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा
गडचिरोली, दि.04: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे बाबतच्या योजनेत आमुलाग्र बदल करण्यात आला असून सदर योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटांना देण्यात येणारे अर्थसहाय्य हे वस्तु स्वरुपात न देता मंजूर अर्थसहाय्यची जास्तीत जास्त रक्कम रुपये 3.15 लाख बचत गटांच्या आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. […]
पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८९ कोटींचा निधी; पर्यटनस्थळांच्या सौंदर्यीकरणासह पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध होणार
मुंबई, दि. 4 : पर्यटनस्थळांवर विविध उपाययोजना करण्यासाठी शासनाने सन २०२१-२२ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ८९ कोटी ४९ लाख १९ हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत पर्यटनस्थळांच्या सौंदर्यीकरणासह पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या अनुषंगाने जिल्हास्तरावरील नवीन कामांना निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जारी […]
“समान संधी केंद्र” च्या वतीने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन विकास व गुणवत्ता वाढीसाठी समाज कल्याण विभागाचा प्रयत्न
गडचिरोली, दि.03: विविध महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रीशिप व इतर शासनाच्या योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबत उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करण्यात येते. संवाद अभियान- युवा संवाद सारखे कार्यक्रम सुरु करण्याकरिता महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी “समान संधी केंद्रे” -(Equal Opportunity Centre) स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक […]
कौशल्य चाचणी तथा सरळ प्रवेश प्रक्रीया द्वारे क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश
गडचिरोली, दि.03: आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे उद्देशाने महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत ११ क्रीडा प्रबोधिनीची स्थापना केली आहे. या क्रीडा प्रबोधिनीमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे यासाठी शासनातर्फे कौशल्य खेळाडू शोध मोहीम राबविली जात आहे. ७ फेब्रुवारी २०२२ पासून ही टॅलेंट सर्च मोहीम राबविली जाणार असून यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहचलेल्या खेळाडूंना […]
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश
गडचिरोली, दि.02: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळामध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेश देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.इ यत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा व दिनांक 01 […]
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून भरता येणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई, दि. 2 – शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार दि. ०१ फेब्रुवारी २०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर सदरचे अर्ज दि. ०१ फेब्रुवारी २०२२ ऐवजी बुधवार दि. १६ फेब्रुवारी २०२२ पासून भरता येतील, संबंधितांनी या […]