नागरिकांशी संवाद प्रशासनाद्वारे त्वरीत उपायोजना गडचिरोली : जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी संजय दैने यांनी भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्ड उपस्थित राहत प्रशासकीय यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना त्वरीत राबवून घेतल्या तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना दक्षता घेण्याबाबत व मदतीबाबत आश्वस्त केले. जिल्हाधिकारी दैने यांनी चांदाळा कुंभी, तसेच आरमोरी, […]
ताज्या घडामोडी
ज्येष्ठांना १०० टक्के अर्थसाहाय्य; ‘वयोश्री’साठी अर्ज करा तहसिलदार चेतन पाटील
नागरिक अनभिज्ञ: तीन हजार रुपये साहित्य-उपकरणे खरेदीसाठी मुलचेरा:-वयाची ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य साधने तसेच उपकरणे खरेदी करावी लागतात. तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदींद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यास मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत […]
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी मछली येथील सुमित्रा पेंदाम या आजार ग्रस्त महिलेला दिली दहा हजार रुपये आर्थिक मदत.
मूलचेरा:- तालुक्यातील गोमनी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मछली येथील रहिवासी सौ.सुमित्रा पेंदाम ही महिला अनेक महिन्यापासून पोटाच्या विकाराने आजारी आहे.त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अडचण झाली होती.ही बाबा अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सौ.सुमित्रा पेंदाम यांच्या पुढील […]
मुलचेरात महसूल कर्मचार्यांच्या काम बंद आंदोलन
मुलचेरा:- महसूल विभागात ४० टक्के पदे रिक्त असून, लोकसंख्येनुसार नवीन आकृतीबंध तयार करावा यासह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचार्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सोमवार १५ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून, दुसर्या दिवशी म्हणजेच १६ जुलै रोजी देखील महसूल कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन सुरू होते. या संपात मुलचेरा येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे […]
शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावी
तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाहन मुलचेरा:तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या खात्याची ई-केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे. ऑक्टोबर-नोव्हेबर २०२१ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी […]
अडीच लाखांपेक्षा उत्पन्न कमी, तरच बहीण मुख्यमंत्र्यांची लाडकी महिलांमध्ये उत्सुकता, १ जुलैपासून स्वीकारणार अर्ज प्रभारी बाल विकास अधिकारी अमरी बिस्वजीत राॅय
मुलचेरा:- राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या घोषणेनंतर महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण होण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात दाटून आली असावी. मात्र, या योजनेच्या निकषांमध्ये पात्र, अपात्रतेच्या अटी असून, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल अशाच बहिणींना मुख्यमंत्र्यांचे लाडाचे आशीर्वाद मिळणार आहे. दरमहा १५०० रुपये महिलांच्या […]
खरीप-२०२४ साठी पीक विमा भरण्यास सुरुवात तालुका कृषी अधिकारी विकास पाटील
मुलचेरा:-प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम – 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात शासनाच्या https://www.pmfby.gov.in या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली आहे अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी 1 कोटी 70 लक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांनी आपला खरीपाचा पीकविमा 15 […]
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनाचा अनुदान आता ‘डीबीटी’ मार्फत मिळणार : तहसिलदार चेतन पाटील
संजय गांधी निराधार व श्रावणबाळचे लाभार्थी कागदपत्रे संबंधित गावचे तलाठी,कोतवाल किंवा तहसील कार्यालयाच्या संगायो विभागात तात्काळ जमा करावेत मुलचेरा: शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. आता मात्र, थेट डीबीटीमार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले […]
२० रुपयांत दोन लाखांचा विमा श्री व्ही पी कुरेकर शाखा व्यवस्थापक दि गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेंट्रल को – ऑप बॅक गडचिरोली शाखा मुलचेरा
मुलचेरा: केंद्र शासनाच्या वतीने २०१५ पासून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत वार्षिक २० रुपयांत दोन लाखांचा विमा दिला जातो. प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकांकडून योजनेसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो. प्रतिदिवसासाठी केवळ पाच पैसे अशा दराने विमा खर्च होत असल्याने सर्वसामान्यांसाठी ही योजना लाभदायक ठरत आहे. २० रुपयांत दोन लाखांचा विमा ■ जेव्हा ही […]
अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा कु. भारती वरुडकर, गृहपाल आदिवासी मुलींचे वसतिगृह मुलचेरा
मुलचेरा: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता 1मुलांचे व 1 मुलींचे असे एकुण 2 शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. त्यातील सन 2024-25 करीता रीक्त जागांवर प्रवेश घेण्याकरीता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. मुलचेरा वसतीगृहात इयत्ता 8 वी ते पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज […]