ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

निवडणुक निरीक्षकांकडून व्यवस्थेची पाहणी स्ट्राँग रुम, कंट्रोल रूम, निवडणूक अधिकारी कार्यालय, मतदान केंद्रांना भेट

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकिच्या अनुषंगाने निवडणूक व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांनी आज उपविभागीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, व उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कक्ष, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्ट्राँग रुम, मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण तथा इव्हीएम वाटप स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना केंद्र, कंट्रोल रूम, माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण कक्ष तसेच मतदान […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

उमेदवार, पक्षांसाठी निवडणुकीबाबतच्या परवानग्या ऑनलाईन मिळण्यासाठी ‘सुविधा 2.0’ मोबाईल ॲप

 भारत निवडणूक आयोगाने (ECI) ‘सुविधा 2.0’ हे मोबाईल अ‍ॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहेत.  यापूर्वी फक्त ऑनलाईन पोर्टलवरच अर्ज सादर करता येत होते, पण आता नवीन अ‍ॅपद्वारे सर्व प्रक्रिया मोबाईलवरून करता येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. सुविधा 2.0 हे मोबाईल ॲप वापरण्यास सहज आणि […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जिल्ह्यात आज 10 उमेदवारांचे 13 नामनिर्देशन अर्ज दाखल

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024 साठी गडचिरोली जिल्ह्यात आज 10 उमेदवारांकडून एकूण 13 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 67-आरमोरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशनपत्र दाखल केले यात कृष्णा दामाजी गजबे (भारतीय जनता पार्टी) यांनी दोन तर प्रा. रमेश गोविंदा मानागडे (अपक्ष) यांनी एक अर्ज दाखल केला आहे. 68-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात सहा नामनिर्देशन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज गडचिरोली विधानसभा क्षेत्र: ईव्हीएम प्रात्यक्षिकासह पहिले प्रशिक्षण

गडचिरोली: ६८-गडचिरोली या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या नियंत्रणाखाली प्रशासन यंत्रणा सज्ज झालेली आहे.२६व २७ ऑक्टोबर रोजी ईव्हीएम यंत्र हाताळण्याच्या प्रात्यक्षिकासह मतदान प्रक्रिया संबंधीचे पहिले प्रशिक्षण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडले.         ६८-गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली, धानोरा व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी व्हिजिल ॲपवर तक्रार करा १०० मिनिटांच्या आत मिळतो प्रतिसाद

विधानसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहिता कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ शॅडो

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हयात सर्वाधिक २३२ शॅडो मतदान केंद्र तर सांगलीत केवळ १ शॅडो मतदान केंद्र असणार आहे. राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र असतील. १२ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र नसतील. या शॅडो मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असणार आहेत. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी “शेतकरी प्रशिक्षण व कृषी निविष्ठा वितरण” कार्यक्रम

मुलचेरा:- भा.कृ.अनु.प.-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर द्वारा व कृषी विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी “शेतकरी प्रशिक्षण व कृषी निविष्ठा वितरण” कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ११ ऑक्टोबर,२०२४ रोजी मुलचेरा तालुक्यातील चुटूगुंटा चक या ठिकाणी आयोजीत करण्यात आले होते. यावेळी कपाशीवरील गुलाबी , बोंड अळीच्या निगराणीसाठी ट्रॅप व कामगंध सापळे, जैविक खते, किटकनाशक व पाण्यात विरघळणारे नत्र:स्फुरद:पालाश […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद जिल्ह्याच्या कृषि, उद्योग

 महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यवतमाळ येथे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. जिल्हा समजून घेतांना विविध क्षेत्रात जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. जिल्ह्याचे कृषि, उद्योग, व्यापार, आरोग्य, पायाभूत सुविधा, राजकारण या क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींशी मनमोकळी चर्चा करतांना त्यांच्या समस्या देखील समजून घेतल्या. यावेळी विभागीय आयुक्त […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे तर खाजगी गटात प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा राज्यातून प्रथम

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज याबाबतची घोषणा केली. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना प्रत्येकी ५१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. मंत्री श्री. केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारित ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये या अभियानाचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय

  सार्वजनिक बांधकाम विभाग   वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार   वांद्रे शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.   या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती ही जागेबाबतची निश्चित करणे, सदस्य संख्या निश्चित करणे तसेच इतर कार्यपद्धती […]