राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन येथे ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल ऑफ इंडिया या व्यापार तंत्रज्ञान परिषदेच्या महाराष्ट्र शाखेचे उदघाटन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या तसेच वर्ल्ड बिझनेस कॉन्क्लेव्हच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या मार्गदर्शकांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी परिषदेचे अध्यक्ष डॉ गौरव गुप्ता, सल्लागार पिनल वानखेडे, महाराष्ट्र शाखेच्या संस्थापक […]
ताज्या बातम्या
भूसंपादन मावेजासाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत अधिग्रहीत जमिनींच्या भूसंपादन मावेजा संदर्भात बैठक जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जलसंपदा प्रकल्पांकरीता अधिग्रहीत जमिनींच्या भूसंपादन मावेजासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जलसंपदा प्रकल्पांकरीता अधिग्रहीत केलेल्या जमिनींचे भूसंपादन संदर्भातील बैठक झाली. यावेळी ग्रामविकास […]
मूलचेरा तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करा
मूलचेरा तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करा भारतीय जनता पक्ष मूलचेरा तालुका समितीची मागणी मूलचेरा तालुक्यातील जवळपास 90% टक्के जनता ही शेतकरी आहे आणि मूलचेरा तालुक्यात 69 गावे समाविष्ट आहेत, येथील शेतकरी शेतीच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवत असतो. माहे जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाने फिरविलेली पाठ, त्यामुळे भूजलाची कमतरता, पेरणी खालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती बिकट […]
महाराष्ट्रात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, ‘या’ 8 सवलती मिळणार
महाराष्ट्र सरकारनं 2023 या वर्षासाठी राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर, तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. शासन निर्णयानुसार, “जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दुरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बांबू लागवड
पर्यावरणाच्या समतोलासाठी व शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे म्हणून राज्य शासनाने बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे. बांबू पासून अनेक उत्पादने घेता येतात यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तरी राज्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त बांबू लागवड करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरे तालुका महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते […]
कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या अनावरण
काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण उद्या मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारदेखील उपस्थित राहणार आहे. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील घेणार […]
हिरालाल समरिया नवे मुख्य माहिती आयुक्त; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ
देशाचे 12वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माहिती आयुक्त श्री. समरिया यांना राष्ट्रपती भवनात मुख्य माहिती आयुक्त पदाची आज शपथ दिली. श्री.समरिया सध्या माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे. हिरालाल समरिया यांच्याविषयी श्री. समरिया यांचा जन्म राजस्थानमधील […]
महिलांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन योजना लाँच – पहा कशी आहे हि योजना
केंद्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक अनोखी योजना आणली आहे. ‘नई रोशनी योजना’ असे या योजनेचं नाव आहे. या योजनेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्र सरकारने केले आहे. पहा कशी आहे हि योजना या योजनेमार्फत महिलांना विविध गोष्टींचे ज्ञान दिले जाणार आहे. जसे कि, बँकिंग, […]
विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरु केली एकात्मिक ऊर्जा विकास योजना – पहा कशी आहे हि योजना
आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षा घेता वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी – केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी ‘एकात्मिक ऊर्जा विकास योजना’ सुरू केली आहे. महाराष्ट्रात हि योजना महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येणार आहे. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची उद्दिष्टे ▪️ शहरी भागातील वीज ग्राहकांना 24X7 वीज पुरवठा करणे. ▪️ वीज […]
ऐन दिवाळीच्या तोंडावर सोमवार 6 नोव्हेंबरपासून राज्यातील एसटी वाहतूक पुन्हा ठप्प होण्याची शक्यता आहे.
विलीनीकरण, सातवा वेतन आयोग आणि इतर काही मागण्यांसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे. याबाबतची नोटीस एसटी महामंडळाला दिली आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची नोटीस मिळाली असल्याचे सांगितले. सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत नवीन समिती स्थापन करावी, त्या समितीसमोर कर्मचाऱ्यांचे मत मांडण्याची सुविधा देण्यात […]