मुंबई, दि. 1 :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेऊन ३ मार्च २०२४ रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. या दिवशी ग्रामीण व शहरी भागातील ५ वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस दिली जाणार असून, सर्व […]
महाराष्ट्र
विकासाचा अटल सेतू पार करून महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 1 : उद्योग क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असून उद्योजकांचा राज्यावरील विश्वास आणि आपली पत वाढून महाराष्ट्राची उद्योगस्नेही ही ओळख पुन्हा प्रस्थापित झाली आहे. राज्य शासनाने विकासाचा अटलसेतू पार केला असून समृद्धीच्या महामार्गाने, एक्सप्रेस वे वरुन बुलेट ट्रेनच्या वेगाने विकास करीत राज्य सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विधानसभेत […]
विविध प्रकल्प व योजनांतून देशाच्या भविष्याची पायाभरणी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
विविध योजना व प्रकल्पांद्वारे गेल्या 10 वर्षात देशाच्या विकासाचा नवा पाया रचण्यात आला. देशाचा प्रत्येक कानाकोपरा विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यासाठी गरीब, युवक, शेतकरी व महिला या घटकांच्या सशक्तीकरणासाठी व्यापक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विकासप्रक्रियेला गती मिळून देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. […]
इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी केंद्राच्या सूचना
केंद्र सरकारने इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादेबाबत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी केल्या आहेत. जारी केलेल्या सूचनांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही यासंदर्भातील पत्र शिक्षण मंत्रालयाने जारी केले होते. केंद्राने सर्व राज्यांना सूचना दिल्या, इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी हे वय असावे केंद्राने सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने […]
पंतप्रधान मोदींनी अंतराळवीरांच्या नावांची केली घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील तिरुवनंतपुरम येथील इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट दिली. यादरम्यान त्यांनी या केंद्रातून ट्रायसोनिक विंड टनेल प्रकल्पाचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांच्यासोबत गगनयान मोहिमेचा आढावा घेतला. यासह, पंतप्रधानांनी गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेतील अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली. प्रशांत बालकृष्णन नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु […]
अहेरी नगर पंचायतच्या प्रभाग क्र. तीन साठी एक कोटींची निधी भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन
अहेरी:-नगर पंचायत अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक कोटींच्या निधीतून विकास कामे केली जाणार असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. प्रभाग क्रमांक तीन मधील विकास कामांसाठी येथील नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई […]
प्रभाग क्र १६ मध्ये होणार विकास कामे;भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन
अहेरी:-स्थानिक नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १६ मध्ये विविध विकास कामे होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते नुकतेच विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांची मागील काही दिवसांपासून आपल्या प्रभागात बुद्ध विहार,सभा मंडप तसेच आदी विकास काम करण्याची मागणी होती.त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांनी मंत्री […]
विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प आज शासनाने सादर केला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प सर्वच घटकांचा विचार करणारा तसेच राज्याच्या समतोल विकासाचा आहे. सबका साथ सबका विकास या मंत्रावर आधारित या अर्थसंकल्पाने शेतकरी, महिला, […]
१ ते ३ मार्च या कालावधीत ताडोबा महोत्सव; वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत पर्यटनासाठी महोत्सवाचे आयोजन – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 26 : वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एकाच दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्व विक्रम प्रस्थापित केला जाणार असल्याचे […]
५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार – मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. २६ : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे १ एप्रिल २०२२ पासूनच्या सुमारे ५ हजार ६०५ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये १ लाख पर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये ७५ हजार पर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती […]