मुंबई, दि. 2 : शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून 27 कोटींहून अधिक रकमेच्या बोगस कर परताव्या संदर्भात रहमत अली मोमीन, वय 26 वर्ष यांस दिनांक 1 नोव्हेंबर 2022 रोजी अटक करण्यात आली. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने सन 2022-23 मधील केलेल्या कार्यवाही पैकी ही 48 वी अटक आहे. मे. फ्लोवेज मार्केटिंग (ओपीसो) प्रायव्हेट लिमिटेड आणि मे. आऊटसोर्स […]
महाराष्ट्र
वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
मुंबई, दि. 2 :- आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या […]
राज्य शासन शिक्षकांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न सोडविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
आंदोलन मागे घेण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आवाहन मुंबई, दि. 2 :- घोषित शाळांतील शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदानाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल आणि मुख्यमंत्री येत्या 15 नोव्हेंबर रोजी याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या अनुषंगाने संबंधित शिक्षकांनी सुरू असलेले […]
सेवा प्रवेश नियम शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या काही पदांचे प्रलंबित सेवा प्रवेश नियम मंडळाच्या शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत. उर्वरीत पदांसाठी मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत, असे निर्देश राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. महाराष्ट्र सागरी मंडळ, गृह (बंदरे व परिवहन) विभागाची सेवा प्रवेश नियम-विनियम करण्याबाबत बैठक मंत्रालयात झाली, त्यावेळी मंत्री श्री. […]
राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन; निवड झालेल्या उमेदवारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देणार
मुंबई, दि. 02 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात एका वर्षात ७५ हजार रोजगार देण्याचा महासंकल्प राज्य शासनाने केला आहे. त्याचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक ३ नोव्हेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय रोजगार मेळावा निमित्ताने निवड झालेल्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. या मेळाव्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दृकश्राव्य माध्यमाद्वारे त्यांचा संदेश देणार आहेत. येथील यशवंतराव […]
ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार ; पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई, दि. 2 : राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले […]
मंत्रिमंडळ निर्णय
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजनेबाबत मंत्रिमंडळ उप समिती स्थापन ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा या योजनेत घ्यावयाची कामे, अंमलबजावणी व इतर निकष सुधारित करण्याबाबत मंत्री मंडळास शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या समितीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री तर सदस्य म्हणून वन व […]