ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुंबईचा कायापालट करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. 28 : मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांना पूर्ण करून मुंबईचा कायापालट करण्यासाठी यंत्रणांनी कामांची गती वाढवावी तसेच कामकाजात पारदर्शकता आणावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गृहनिर्माण विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी बांद्रा येथील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी  गृहनिर्माण विभागाचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुंबई शहर जिल्ह्याच्या पर्यटनासाठी ‘सहल मुंबईची’ ॲप पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून नाविन्यपूर्ण पर्यटन मोबाईल ॲपची प्रसिद्धी करण्याच्या सूचना

मुंबई, दि. 27 : जागतिक पर्यटन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मुंबई शहर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपच्या प्रसिद्धीची सुरुवात मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन येथे करण्यात आली. मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या या ॲपबाबत पालकमंत्री यांनी समाधान व्यक्त केले. या पर्यटनविषयक मोबाईल ॲपचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

विद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 27 : विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाविद्यालयामध्ये प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी सीईटीकक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आढावा बैठक  झाली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ई-बिल आणि व्हाऊचर प्रोजेक्ट्स प्रणालीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 26 :- गतिमान ई-प्रशासनासाठी विकसित करण्यात आलेल्या ई- बिल आणि व्हाउचर प्रोजेक्ट्स प्रणालीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात करण्यात आले. वित्त विभागांतर्गत संचालनालय, लेखा व कोषागारे, यांचेमार्फत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांच्या माध्यमातून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वित्त व नियोजन विभागाची आढावा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

निर्यातदारांसाठी २८ व २९ सप्टेंबर रोजी कार्यशाळा आणि प्रदर्शन

मुंबई, दि. 26 : मुंबईतील निर्यातदारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा तसेच जिल्ह्यातील निर्यातदारांचे निर्यातक्षम उत्पादनाचे दोन दिवसीय प्रदर्शन 28 व 29 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मजदूर मंजिल, जी.डी.आंबेकर मार्ग, भोईवाडा, परेल, मुंबई-400012 येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हा उपक्रम मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात मुंबई शहर जिल्हा अव्वल फेरीवाले, मच्छीमार आणि असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी – जिल्हाधिकारी राजीव निवतकर

मुंबई, दि. 22 : राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना मिळावा, यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाने असंघटित कामगारांची नोंदणी केंद्र सरकारच्या ई-श्रम या वेब पोर्टलवर करण्यासाठी कामगारांना प्रोत्साहित करावे. मुंबईतील फेरीवाले आणि मच्छीमार यांची असंघटित कामगार म्हणून जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, यासाठी आवश्यकतेनुसार त्यांच्या भागात शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना मुंबई शहर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

धान व भरडधान्य खरेदी आराखड्यास केंद्राची मान्यता

मुंबई, दि. 22 : राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या धान व भरडधान्य खरेदीच्या आराखड्यास केंद्राने मान्यता दिली असून, राज्यास 1 कोटी, 49 लाख क्विंटल धान व 61,075 क्विंटल भरडधान्य खरेदीस परवानगी दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. खरीप पणन हंगाम 2022 – 23 मध्ये धान व भरडधान्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यपालांच्या हस्ते मेधावी विद्यार्थी व प्राचार्यांना एनबीटी यंग स्कॉलर्स सन्मान प्रदान

मुंबई, दि. 22 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दहावी परीक्षेत उत्तम गुणांसह उत्तीर्ण झालेल्या मेधावी विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्यांना राजभवन येथे ‘नवभारत टाइम्स ‘यंग स्कॉलर्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला नवभारत टाइम्स वृत्तपत्राचे निवासी संपादक कॅप्टन सुंदरचंद ठाकूर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच पालक उपस्थित होते. आज महिला सर्वच क्षेत्रात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती विदर्भ

महिला किसान योजना असा लाभ

पीएम किसान व सीएम किसान या संदर्भातील माहिती तर तुम्हाला असेलच परंतु महिला किसान योजना mahila kisan yojana संदर्भात जर तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या या योजनेचा लाभ कसा दिला जातो. महिला किसान योजना अंतर्गत अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो ज्या अनुसूचित जाती समाजातील आहेत. अनुसूचित जातीमधील ज्या उपजाती आहेत जसे की […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन वाटप

मुंबई, दि.17 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज महाविद्यालय तसेच विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या 20 दिव्यांग विद्यार्थ्यांना श्रवण मार्गदर्शन सुविधा असलेल्या मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड व नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ परसन्स विथ व्हिजुअल डिसेबिलिटीज (दिव्यांगजन), डेहराडून यांच्या वतीने सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अदीप योजनेअंतर्गत गरीब […]