राज्यात लम्पी चर्मरोगाचा होत असलेला प्रादुर्भाव विचारात घेऊन या रोगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लम्पी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांनी दिली. समन्वय कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८४५१३२ श्री.गुप्ता म्हणाले,राज्यात लम्पी चर्मरोगावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण […]
महाराष्ट्र
ज्ञान, विज्ञान आणि तंत्रशिक्षणात मातृभाषा आणि हिंदी भाषेचा उपयोग करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 14: ज्ञान, विज्ञान आणि तंत्रशिक्षणात अधिकाधिक मातृभाषा आणि हिंदी भाषेचा उपयोग दैनंदिन वापरात करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आज सह्याद्री अतिथीगृह येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी हिंदी साहित्यिक डॉ. शीतलाप्रसाद दुबे आणि आनंद सिंह यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, […]
प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत प्रमाणपत्रे सादर करण्यास मुभा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 15 : शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता विविध अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांना लागणारी विविध प्रमाणपत्रे प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशित होताना विविध प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. त्यामध्ये EWS/NCL/CVC/TVC या प्रमाणपत्रांचाही समावेश असतो. विद्यार्थ्यांना असे प्रमाणपत्र […]
कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत टप्पा २ सुरू पहा आजचा शासन निर्णय
कुसुम योजनेंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्यात आस्थापित करण्यात येणाऱ्या सौर कृषि पंपांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील तरतुदींतून रु. 1050.00 लाख इतकी निधी मागणी ऊर्जा विभागाने केली आहे Kusum Yojana – कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत टप्पा २ सुरू पहा आजचा शासन निर्णय आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत ऊर्जा विभागाकडून अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेंतर्गत […]
माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी देवनगर येथील हृदय रोग पीडित गौतम बिश्वास यांना केले आर्थिक मदत
मुलचेरा:- तालुक्यातील देवनगर येथील गौतम बिश्वास मागील बरेच दिवसापासून हृदय रोगापासून ग्रस्त होते.घरची परिस्थिती बिकट असल्याने उपचारासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. देवनगर येथील भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी सदर माहिती माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या दरबारी पोहचवले दानशूर राजा यांनी आर्थिक मदत दिली. माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे प्रतिनिधी म्हणून भाजप […]
माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी कोपरल्ली येथील कॅन्सर पीडित महिलेला केली आर्थिक मदत
दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत मूलचेरा:- तालुक्यातील स्थानिक कोपरल्ली येतील रहवासी असलेल्या लिलाबाई गजानन नैताम ही महिला गेल्या एका वर्षांपासून कॅन्सर सारख्या गंभीर रोगाने त्रस्त होती आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने खूप मोठी अडचण या परिवारावर आली होती.पण ही बाब राजे अमरीशराव महाराज माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लक्षात येताच […]
राज्यात लवकरच ” मुख्यमंत्री किसान योजना ” सुरु ! शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रु. मिळणार
शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी ! लवकरच राज्यात मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली जाणार आहे. राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्याची योजना अमलात आणली आहे. Mukhya Mantri Kisan Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रु. इतकी रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यात लवकरच ” मुख्यमंत्री किसान योजना ” लागू करण्याचा निर्णय राज्य […]
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी
मुंबई, दि. ९ : येथील गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेले भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी करत अभिवादन केले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर…” या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला.कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा झाला. गणरायाला निरोप देण्यासाठी […]
राजभवन येथील ११ सप्टेंबर रोजीचा सरन्यायाधीश यांचा सत्कार समारंभ पुढे ढकलला
मुंबई दि 9 : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे दुःखद निधनामुळे भारत सरकारने दि. 11 सप्टेंबर, 2022 रोजी संपूर्ण देशभर दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने रविवार दि.11 सप्टेंबर, 2022 रोजी मुंबई, राजभवन येथे आयोजित केलेला भारताचे सरन्यायाधीश श्री. उदय उमेश लळीत यांचा सत्कार समारंभ पुढे ढकलण्यात आलेला आहे, असे अवर सचिव, सामान्य […]
ढगफुटीसदृश पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि. ८- पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची […]