लोकरथ न्यूज नेटवर्क पुणे दि.3पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनरी पान आहे आणि यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आहे. समाजासमोर गुणवान व्यक्तींचा आदर्श प्रस्तूत करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ३४ व्या पुणे फेस्टिवलच्या उद्घान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, […]
महाराष्ट्र
वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करणे हा शासनाचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकरथ न्यूज नेटवर्क पुणे स्टेशन ई-बस डेपोचे उद्घाटन आणि ९० ई-बसचे लोकार्पण हरित ऊर्जा उपयोगाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर – केंद्रीय मंत्री डॉ.महेंद्रनाथ पांडे पुणे दि.3- पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी उड्डाणपूलांची रखडलेली कामे, मेट्रो विस्ताराच्या कामांना गती, चांगले रस्ते उपलब्ध करून देणे यासोबतच सार्वजनिक बससेवेत सुधारणा करणे यावर शासनाचा भर […]
आयएनएस विक्रांतचे जलावतरण छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकरथ न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून नौदलासह भारतीय सेनेला शुभेच्छा मुंबई, दि. :3- संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत केले आहे. तर हा क्षण शिवभक्तांसाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा, गौरवाचा […]
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
राज्य शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या […]
महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी ५० नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज
मुंबई, दि.26 : ऑनलाइन इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर (IITF) प्रमाणन कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या 50 यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे प्रमाणपत्रांचे वितरण करून पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर तसेच सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर आदी यावेळी उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी […]
आता खेळाडूंना मिळणार ‘एवढे’ लाख रुपये, राज्य सरकारची मोठी घोषणा..
राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीष महाजन यांनी खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळण्याच्या हेतूने बक्षिसाच्या रकमेची वाढ केल्याचं समजतंय. यामुळे सहभागी खेळाडूंची संख्या वाढेल आणि अधिकाधिक खेळाडू, युवक खेळाकडे आकर्षित व्हावे याकरीता राज्य शासनाने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत ही मोठी वाढ केली आहे. पत्रकार परिषदेत माहिती देताना मंत्री महाजन […]
महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर
मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत दि. 31 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते. या गौरव पुरस्कारास अनुसरून परभणी जिल्ह्यातील कर्नल समीर बळवंत गुजर यांना मेन्शन इन डिस्पॅच हे पदक बहाल करण्यात आले असून या पुरस्काराकरिता 6 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. […]
रात्रशाळेबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करणार – शिक्षणमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 25 : राज्यातील रात्रशाळांबाबत सर्वसमावेशक धोरण दोन महिन्यामध्ये तयार करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील रात्रशाळांकरिता सर्वांकष धोरण निश्चित करण्याबाबत सदस्य नागोराव गाणार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर बोलत होते. शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सर्वसमावेशक […]
चामोर्शी तालुक्यात पिक विमा सुविधा केंद्राचे उद्घाटन
चामोर्शी:- पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांचे बरेच समस्या असतात यांचे समस्या निराकरन करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भारतीय कृषी पिक विमा कंपनीचे सुविधा केंद्राचे उद्घाटन मा. तालुका कृषी अधिकारी श्रीमती एस.एस. परदेशी यांचे हस्ते करण्याताआले. यावेळी प्रतिष्ठित शेतकरी श्री राजू पाटील चुदरी, श्री. मुखरेश्वर पाटील चुदरी, प्रफुल यम्पल्लीवर, नितेश नानगिरवार, तालुका प्रतिनिधी संतोष नायगमकर, कृषी पर्यवेक्षक श्री. गजभिये […]
कोविड-१९ कालावधीमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता सेतू अध्ययन उपक्रम
मुंबई, दि. 24 :- कोविड-१९ साथीच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षणाचा अपेक्षित दर्जा राखण्यात काही मर्यादा आल्या. विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययननिष्पत्ती साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमधील उणीव दूर करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम परिपूर्णतेसाठी ‘Bridge Course’ ची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांमध्ये “कोविड १९ कालावधीमध्ये शिक्षण […]