अमृत महाआवास अभियान २०२२-२३ मुंबई, दि. 23 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून ते 31 मार्च 2023 या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महाआवास अभियान पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 24 नोव्हेंबर, 2022 रोजी मुंबईतील […]
महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवारी शहीद स्मारकाला भेट देऊन वाहिली श्रद्धांजली
नागपूर दि. 23 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील झिरो माईल्स परिसरातील गोवारी शहीद स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी आजच्याच दिवशी 23 नोव्हेंबर रोजी चेंगराचेंगरी होऊन 114 गोवारी बांधव शहीद झाले होते. दरवर्षी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून गोवारी बांधव या ठिकाणी अभिवादन सोहळ्याला उपस्थित असतात. आज 28 वा गोवारी शहीद स्मृती दिवस आहे. उपमुख्यमंत्री […]
‘ओरल हेल्थकेअर’साठी अधिकाधिक निधी उपलब्ध करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दंत महाविद्यालयाला अत्याधुनिक वसतिगृह देणार नागपूर, दि. 23 : मध्य भारतामध्ये नागपूर व परिसरात मोठ्या प्रमाणात मौखिक आजार (ओरल डिसीज) व कर्क रोगाचे (कॅन्सरचे) आजार बळावले आहेत. या परिसरात ओरल हेल्थकेअरसाठी सर्वसमावेशक उपचार पद्धती अस्तित्वात असणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. शासकीय दंत महाविद्यालयातील […]
अकोला हे देशात दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल अकोला, दि.23 (जिमाका)-: अकोला रेल्वे स्थानक हे दक्षिण व उत्तरेकडील राज्यांना जोडणारे महत्त्वाचे स्थानक आहे. अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असून येत्याकाळात देशात हा जिल्हा दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. अकोला-अकोट पॅसेंजर (गाडी […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री साईबाबा समाधी दर्शन
अहमदनगर, दि. 23 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा […]
पाईप लाईन योजना अनुदानावर मिळेल PVC Pipe असा करा अर्ज
आजच्या लेखामध्ये पाईप लाईन योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात pvc pipeline scheme. तुमच्या शेतात विहीर असेल, विहिरीवर मोटार असेल पाणी उपसा करण्यासाठी वीज देखील असेल परंतु विहिरीतील बोअरमधील किंवा शेततळ्यातील पाणी पिकांना देण्यासाठी पाईप लाईन केलेली नसेल तर मात्र पिकांना पाणी देण्यासाठी तुमची पंचाईत होऊ शकते. पिकांना जर वेळेवर पाणी दिले गेले नाहीत तर शेतकरी […]
सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीच्या निवड समित्या पुनर्गठित
मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुरस्कारार्थी निवडण्यासाठीच्या विविध समित्या पुनर्गठित करण्यात आल्या आहेत, तर एका समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर […]
धान खरेदी : नियोजित तारखांप्रमाणेच आधारभूत केंद्र सुरु होणे आवश्यक – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. २२ : खरीप हंगामातील धान खरेदी १ ऑक्टोबर रोजी आणि रबी हंगामातील धान खरेदी १ मे रोजी सुरू करण्याचे शासकीय धोरण आहे. त्यामुळे नियोजित तारखांप्रमाणेच आधारभूत केंद्र सुरु होणे आवश्यक असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्हयातील आधारभूत धान खरेदी अंतर्गत उद्भवणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात मंत्रालयात वनमंत्री श्री. मुनगंटीवार आणि […]
मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्यालय उभारणार – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 22 : मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्य संकुल आणि अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यात येईल, असे आज मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयात तारापोरवाला मत्स्यालयासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी यासंदर्भातील निर्देश विभागाला दिले. हे नवीन जागतिक दर्जाचे मत्स्यालय सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर विकसित करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा. हे मत्स्यालय जगातील सर्वोत्तम मत्स्यालयापैकी एक […]
राज्यात दुग्ध उत्पादनातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करणार – डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन
डेन्मार्कच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट मुंबई, दि. 22 : डेन्मार्क हा जगातील आघाडीचा दुग्ध उत्पादक देश असून आपल्या देशाने भारताला दुग्ध क्रांती घडवून आणण्यात मदत केली आहे. डेन्मार्क भारतातील अनेक राज्यांना कृषी व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सहकार्य करीत असून लवकरच महाराष्ट्रात दुग्ध उत्पादनातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करणार असल्याची माहिती डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन […]