मुंबई,:- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित […]
महाराष्ट्र
तेलंगणा सख्खा शेजारी, त्याच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: – तेलंगणा महाराष्ट्राचा सख्खा शेजारी आहे. त्याच्याशी जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी निगडीत क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासमवेत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आंतरराज्यीय संयुक्त जलसिंचन प्रकल्पांविषयीही विस्तृत चर्चा […]
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा – अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यात सात कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर राज्यात 25 लाख 05 हजार 300 अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना तर 5 कोटी 92 लाख 16 हजार प्राधान्य कुटुंब लाभार्थींना सवलतीच्या दरात अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक हक्क […]
ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे तसेच उद्धवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने उर्वरित मदत वितरित करण्याबाबत शासन निर्णय
Nuksan Bharpai Maharashtra:-ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता / शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून मागविण्यात आले होते. दरम्यानच्या कालावधीत दि.१३.१०.२०२१ रोजीच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर, २०२१ पर्यंत अतिवृष्टीमुळे […]
शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. १९ :- छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले आहे. त्यांनी राज्यातील जनतेला शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अभिवादन संदेशात […]
मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परीवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राबविणेसाठी अर्ज आंमत्रित
गडचिरोली: मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परीवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारीत संस्थांकडून मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज हे शेतमाल, शेळया (मांस व दुग्ध) आणि परसबागेतील कुकुटपालन (अंडी) यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उप्रप्रकल्पांसाठी आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारीत संस्थामध्य शेतकरी उत्पादक कंपनी,आणि त्यांचे फेडरेशनस, महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती […]
RTE 25% Admission नियम, अटी, पात्रता काय असते? | RTE Admission Maharashtra Process 2022-23
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना आपल्या शाळेत किमान 25% प्रवेश देण्याची तरतूद केलेली आहे. 25 % अंतर्गत प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. पालकांनी स्वतः ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे. कृपया पालकांनी यांची नोंद घ्यावी. प्रवेशाकरिता वेबसाईट आहे – https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex […]
मंत्रिमंडळ बैठक
मुंबई, दि. 16 :- अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या योजनेसाठी 7.81 कोटी इतका निधी देण्यात येईल. पोहरा प्रमाणेच राज्यातील उर्वरित 5 महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी समूह प्रकल्प राबविण्यास देखील मान्यता […]
धर्मादाय योजनेंतर्गत खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक
मुंबई, : खाजगी रुग्णालयांमध्ये धर्मादाय योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय मदत-सुविधा मिळताना होणारा विलंब तसेच प्रत्यक्ष रुग्णालय आस्थापनांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधि व न्याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थिती आढावा बैठक झाली. यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार देवेंद्र भुयार, सह धर्मादाय आयुक्त आर.यू. मालवणकर, सह धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई नि.सु. पवार, धर्मादाय […]