महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, चंद्रपूर (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या १२७ जागा संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा), इलेक्ट्रिशियन आणि वारयमन पदाच्या जागा अर्ज करण्याची तारीख – दिनांक ८ ते १८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
महाराष्ट्र
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
मुंबई दि. ६ : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली […]
लतादीदींच्या निधनामुळे संगीताचा आवाज लोपला- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
मुंबई, दि. ६ – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज संगीताचे सूर हरपले असून संगीताचा आवाज लोपला आहे, त्यामुळे प्रत्येक चाहता आज नि:शब्द आहे, या शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तीन पिढ्यांशी समरस झालेल्या लतादीदी या ईश्वराची देण होत्या, त्या पुन्हा होणे नाही. “मेरी आवाज ही […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
-शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या दिल्या सूचना- स्वर युगाचा अंत झाला मातृतुल्य आशीर्वाद हरपला मुंबई, दि.६ :- लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या […]
यंत्रमागधारकांच्या समस्यांच्या अभ्यासासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठीत – वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची माहिती
मुंबई, दि.5 : राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना सूचविण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती भिवंडी, मालेगाव, धुळे, सोलापूर, इचलकरंजी आदी यंत्रमागबहुल भागांची प्रत्यक्ष पाहणी करून महिनाभरात शासनास अहवाल सादर करेल, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिली. वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी भिवंडी येथे झालेल्या […]
सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू होणार; शासनाच्या निर्देशानुसार क्रीडा स्पर्धांना परवानगी द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक मुंबई, दि. ५ : शासनाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार विविध क्रीडा स्पर्धांना २५ टक्के प्रेक्षक उपस्थितीत परवानगी देण्यात यावी आणि कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत […]
महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती”
मुंबई, दि. 4 :- ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला होता. यावर्षीपासून राजपथावरील पथसंचलनात सामील झालेल्या राज्यांच्या चित्ररथाला आणि लष्करी मार्चिंग तुकडीला ऑनलाईन नोंदणीव्दारे मत देऊन जिंकविता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. त्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी राजपथावरील […]
‘मावज’च्या सोशल मीडिया मोहीमेमुळे महाराष्ट्राच्या चित्ररथास ‘लोकपसंती’ – माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर
मुंबई, दि. 5 :- ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला होता. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आक्रमक सोशल मीडिया मोहीमेमुळे जनादेश जिंकण्यात मोलाची मदत झाल्याचे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी काढले […]
बुलडाणा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा राबवावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राज्यपालांकडून लोणार सरोवर परिसराची पाहणी बुलडाणा, दि. 5 : बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा, लोणार, शेगाव अशी वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे असून लगतच्या जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरूळ अशा पर्यटनस्थळांची जोड देऊन एक परिपूर्ण पर्यटन सर्कीट विकसित होऊ शकते. त्यामुळे या सर्व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा राबवावा, असे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज दिले. राज्यपाल श्री. कोश्यारी […]
स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा
गडचिरोली, दि.04: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे बाबतच्या योजनेत आमुलाग्र बदल करण्यात आला असून सदर योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटांना देण्यात येणारे अर्थसहाय्य हे वस्तु स्वरुपात न देता मंजूर अर्थसहाय्यची जास्तीत जास्त रक्कम रुपये 3.15 लाख बचत गटांच्या आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. […]