उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती मुंबई, दि. 1 : महिलांना शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात एसएनडीटी विद्यापीठाचा मोठा वाटा आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ झालेल्या एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र येत्या जूनपासून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सुरु करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी सातत्याने पाठपुरावा केला होता. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून […]
महाराष्ट्र
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी-सुविधा द्याव्यात – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई, दि. 1 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. यंदा ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, त्यामुळे प्रशासनाच्यावतीने सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर […]
शारीरिक शिक्षक, ग्रंथपाल पदभरतीसाठी कार्यवाही करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील रिक्त पदे तसेच वस्त्रोद्योग विभागातील सूतगिरण्यांच्या पुनर्वसनाबाबत आढावा बैठक मुंबई, दि. 1 : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अनुदानित महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पदांचा आढावा घेऊन संबंधित पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करावी. राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित अनुदान दरात 60 टक्के वाढ करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
सर्वांच्या सहभागातून विद्यापीठाला आदर्श विद्यापीठ बनवू – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 1 : “महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून राज्यातील युवकांचे सक्षमीकरण आणि त्यांचा कौशल्य विकास होईल, त्या माध्यमातून राज्यात कुशल रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीच्या चळवळीला मोठी गती प्राप्त होईल. सर्वांच्या सहभागातून या विद्यापीठाला आदर्श विद्यापीठ बनवू”, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राज्यात विशेषत: शहरी भागात केंद्रीत झालेली कौशल्य विकासाची […]
मुलचेरा तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रमोद गुट्टेवार यांची निवड
मुलचेरा- नगर पंचायत चे माजी नगरसेवक प्रमोद गुट्टेवार यांची मुलचेरा तालुका काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमोद गुट्टेवार यांची शिफारस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रशासन व संघटन सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या कडे केली होती. काँग्रेसचे प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी प्रमोद गुट्टेवार यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्याबाबत […]
बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर, नोकर भरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय…
कोरोना काळात सारं काही ठप्प झालं होतं.. महसूली उत्पन्न घटले होते. दुसरीकडे आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी मोठा खर्च होत होता. या साऱ्याचा परिणाम राज्य सरकारच्या तिजोरीवर झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने नोकर भरतीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले होते.. सरकारी नोकर भरती बंद असल्याने सध्या राज्यात दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यापैकी सुरुवातीच्या टप्प्यात 75 […]
सिरोंचा तालुक्यात आदिवासी विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार
माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली दोन्ही पक्षाच्या ३०० कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सह अनेक प्रमुख नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याने दोन्ही विरोधी पक्षात उडाली मोठी खडबड सिरोंचा :- तालुक्यातील टेकडा येते काल झालेल्या भव्य प्रवेश कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकास कामांचा आढावा
सातारा दि. 31: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दरे (ता. महाबळेश्वर) दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाबळेश्वर, पाचगणीसह सातारा जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन तसेच धार्मिक व यात्रा स्थळांच्या विकास कामांचा आढावा घेतला. दरे ता. महाबळेश्वर येथील निवासस्थानी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकास कामांची माहिती दिली. या प्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष […]
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ३०९१ पशुपालकांच्या खात्यावर ८.०५ कोटी रुपये जमा – सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई, दि.३१ : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 3091 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईपोटी रु. 8.05 कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री. सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. 31 ऑक्टोबर २०२२ अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3204 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील […]
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यामुळे भारत एकसंध – जिल्हाधिकारी निधी चौधरी
मुंबई उपनगर, दि. ३१ : “सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकसंध भारताचे स्वप्न बघितले होते आणि त्यांच्या कार्यामुळेच ते स्वप्न सत्यात उतरले. त्याचबरोबर भारतात प्रशासकीय सेवा सुरू करण्याचे श्रेयदेखील सरदार वल्लभभाई पटेल यांनाच जाते. त्यांचे हे कार्य देश नेहमीच लक्षात ठेवेल आणि त्यांच्या कार्यामुळे युवा पिढीला सातत्याने प्रेरणा मिळेल”, असा विश्वास मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती […]