ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

खरीप पणन हंगाम 2022-23 साठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करीता दिनांक 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

गडचिरोली: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत नाशिक,उप प्रादेशिक कार्यालय,अहेरी (उच्च श्रेणी ) अंतर्गत शासनाच्या निर्देनुसार खरीप पणन हंगाम 2022-23 साठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करीता निर्णयनुसार दिनांक 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ मिळालेली असून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक,उप प्रादेशिक कार्यालय,अहेरी (उच्च श्रेणी ) मार्फत महामंडळाचे एटापल्ली येथे खरेदी केंद्र सुरु […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणाद्वारे आदर्श पिढी घडविण्याचे काम करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिक्षण हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून राज्याच्या शिक्षण विभागाचे काम पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने सुरू आहे. शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकांनी देखील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांची आदर्श पिढी घडविण्याचे काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर निकषांची पूर्तता करणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आ.धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस हजारो कार्यकर्त्यांचा उपस्थितीत उत्साहात साजरा

अहेरी:- माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस जिल्हाभरातील हजारो कार्यकर्त्यांचा उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 20 ऑक्टोबर हा दिवस अहेरी राज परिवारातील सदस्यांसाठीच नव्हेतर जिल्हाभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचा दिवस असतो.दरवर्षीच या दिवशी धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.यंदा सुद्धा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राजे साहेबांची ऊर्जा मित्र टिम एटापल्ली-भामरागडला आर्थीक मदत

अहेरी:- भामरागड-एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागात जिथे अद्यापही विज व गॅस पोहोचणे दुरापास्त आहे अशा भागात प्रकाशाचे किरण ठरलेले ऊर्जा मित्र टिमची दखल भारत सरकारने घेतली.भारतीय ऊद्योग संघ (CII) मार्फत दिल्लीला होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील “आत्मनिर्भर भारत प्रदर्शनी” मध्ये प्रकल्प सादर करण्यासाठी या टिमला आमंत्रीत करण्यात आले. अपारंपारीक ऊर्जा क्षेत्रात जनजागृती करणे व लोकांना या क्षेत्राचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कल्याण संघटक व लिपीक टंकलेखक पद कंत्राटी पध्दतीने गडचिरोलीत भरती

गडचिरोली: जिल्हा सैनिक कल्याण कक्ष,गडचिरोली करीता सैनिक प्रर्वगामधुन अशासकीय,निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन रुपये 13,323/- कंत्राटी पध्दतीने कल्याण संघटक व लिपीक टंकलेखक 2 पदे ( 175 दिवसा करीता फक्त्) भरावयाचे आहे. सदर पदासाठी इच्छूक माजी/आजी माजी सैनिक पत्नी /विधवा पत्नी यांनी या कार्यालयात दिनांक 07 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 12.30 वाजता सैन्य सेवेतील संपुर्ण मुळ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभार्थींनी आधार नोंदणी करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 19 : सामाजिक न्याय विभागासह इतर विभागांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी नागरिकांनी आधार नोंदणी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रादेशिक कार्यालय, मुंबई व माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र राज्यात आधारचा वापर वाढविण्यासाठी तसेच प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अलिकडील काळात […]

अंतरराष्ट्रीय ताज्या घडामोडी देश महाराष्ट्र मुंबई राज्य

झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बांधकाम व्यावसायिकांना सूचना

मुंबई, दि. 18 :- गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन  आगामी २ – ३ वर्षांमध्ये मुंबईत कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही, या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बांधकाम व्यावसायिकांना केले. सर्वांना घर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. 16 : पोलीसांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. 40 वर्ष वयावरील सर्व पोलीसांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईल, यासाठी पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय संस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.             अपोलो क्लिनिक कुलाबा मुंबई येथे सेवेक्स टेक्नॉलॉजीच्या सहाकार्याने मुंबई वाहतूक पोलीसांच्या संपूर्ण आरोग्य तपासणी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मालमत्ताविषयक प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई दि.16 : कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया – महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री (क्रेडाई-एमसीएचआय) यांच्यावतीने वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात आयोजित मालमत्ताविषयक प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष बोमन इराणी, निवडून आलेले अध्यक्ष अजय अशर, सचिव धवल अजमेरा, कोषाध्यक्ष प्रितम चिवुकुला, कन्व्हेनर प्रॉपर्टी एक्स्पो निकुंज सांघवी, उपाध्यक्ष डॉमनिक रोमेल, पूर्वाध्यक्ष दिपक गोराडिया, मयूर शाह, नयन शाह […]