मुंबई, दि. 22 : राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या धान व भरडधान्य खरेदीच्या आराखड्यास केंद्राने मान्यता दिली असून, राज्यास 1 कोटी, 49 लाख क्विंटल धान व 61,075 क्विंटल भरडधान्य खरेदीस परवानगी दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. खरीप पणन हंगाम 2022 – 23 मध्ये धान व भरडधान्य […]
महाराष्ट्र
राज्यपालांच्या हस्ते मेधावी विद्यार्थी व प्राचार्यांना एनबीटी यंग स्कॉलर्स सन्मान प्रदान
मुंबई, दि. 22 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दहावी परीक्षेत उत्तम गुणांसह उत्तीर्ण झालेल्या मेधावी विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्यांना राजभवन येथे ‘नवभारत टाइम्स ‘यंग स्कॉलर्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला नवभारत टाइम्स वृत्तपत्राचे निवासी संपादक कॅप्टन सुंदरचंद ठाकूर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच पालक उपस्थित होते. आज महिला सर्वच क्षेत्रात […]
महिला किसान योजना असा लाभ
पीएम किसान व सीएम किसान या संदर्भातील माहिती तर तुम्हाला असेलच परंतु महिला किसान योजना mahila kisan yojana संदर्भात जर तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या या योजनेचा लाभ कसा दिला जातो. महिला किसान योजना अंतर्गत अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो ज्या अनुसूचित जाती समाजातील आहेत. अनुसूचित जातीमधील ज्या उपजाती आहेत जसे की […]
राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन वाटप
मुंबई, दि.17 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज महाविद्यालय तसेच विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या 20 दिव्यांग विद्यार्थ्यांना श्रवण मार्गदर्शन सुविधा असलेल्या मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड व नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ परसन्स विथ व्हिजुअल डिसेबिलिटीज (दिव्यांगजन), डेहराडून यांच्या वतीने सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अदीप योजनेअंतर्गत गरीब […]
शेतकरी पशुपालकांना लम्पी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना -प्रधान सचिव जे. पी. गुप्ता
राज्यात लम्पी चर्मरोगाचा होत असलेला प्रादुर्भाव विचारात घेऊन या रोगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लम्पी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांनी दिली. समन्वय कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८४५१३२ श्री.गुप्ता म्हणाले,राज्यात लम्पी चर्मरोगावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण […]
ज्ञान, विज्ञान आणि तंत्रशिक्षणात मातृभाषा आणि हिंदी भाषेचा उपयोग करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 14: ज्ञान, विज्ञान आणि तंत्रशिक्षणात अधिकाधिक मातृभाषा आणि हिंदी भाषेचा उपयोग दैनंदिन वापरात करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आज सह्याद्री अतिथीगृह येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी हिंदी साहित्यिक डॉ. शीतलाप्रसाद दुबे आणि आनंद सिंह यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, […]
प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत प्रमाणपत्रे सादर करण्यास मुभा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 15 : शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता विविध अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांना लागणारी विविध प्रमाणपत्रे प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशित होताना विविध प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. त्यामध्ये EWS/NCL/CVC/TVC या प्रमाणपत्रांचाही समावेश असतो. विद्यार्थ्यांना असे प्रमाणपत्र […]
कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत टप्पा २ सुरू पहा आजचा शासन निर्णय
कुसुम योजनेंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्यात आस्थापित करण्यात येणाऱ्या सौर कृषि पंपांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील तरतुदींतून रु. 1050.00 लाख इतकी निधी मागणी ऊर्जा विभागाने केली आहे Kusum Yojana – कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत टप्पा २ सुरू पहा आजचा शासन निर्णय आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत ऊर्जा विभागाकडून अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेंतर्गत […]
माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी देवनगर येथील हृदय रोग पीडित गौतम बिश्वास यांना केले आर्थिक मदत
मुलचेरा:- तालुक्यातील देवनगर येथील गौतम बिश्वास मागील बरेच दिवसापासून हृदय रोगापासून ग्रस्त होते.घरची परिस्थिती बिकट असल्याने उपचारासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. देवनगर येथील भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी सदर माहिती माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या दरबारी पोहचवले दानशूर राजा यांनी आर्थिक मदत दिली. माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे प्रतिनिधी म्हणून भाजप […]
माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी कोपरल्ली येथील कॅन्सर पीडित महिलेला केली आर्थिक मदत
दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत मूलचेरा:- तालुक्यातील स्थानिक कोपरल्ली येतील रहवासी असलेल्या लिलाबाई गजानन नैताम ही महिला गेल्या एका वर्षांपासून कॅन्सर सारख्या गंभीर रोगाने त्रस्त होती आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने खूप मोठी अडचण या परिवारावर आली होती.पण ही बाब राजे अमरीशराव महाराज माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लक्षात येताच […]