गावकऱ्यांच्या मागणीला यश.भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न एटापल्ली:तालुक्यातील अतिदुर्गम व आदीवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या व गेदा ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट ताडपल्ली येथे भगवान बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न झाले. शहीद बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असून ते भारताचे महान […]
मुंबई
गडचिरोली पोलीस दलाने एकुण 28 किमी पायी अभियान करत अतिसंवेदनशिल अशा विसामुंडी व इरपनार येथे केले ध्वजारोहन
पोलीस अधीक्षक कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली गेली होती. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. म्हणुन 26 जानेवारी या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. आज दिनांक 26/01/2024 रोजी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त पोलीस अधीक्षक कार्यालय […]
…आणि अंगणवाडी सेविकांना मिळाला संयुक्त राष्ट्रसंघ अध्यक्षांच्या हस्ते स्मार्टफोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती विनंती
मुंबई दि. २६: आज अंगणवाडी सेविकांना खुद्द संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हस्ते स्मार्ट फोन मिळाला. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेनिस फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्र प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक सुरु होती. या बैठकीनंतर राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्ट फोन वितरण कार्यक्रम होता, ज्यासाठी अंगणवाडी सेविका आणि संबंधित अधिकारी वर्षा […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘स्किल सेंटर ऑन व्हील’ बसचे लोकार्पण
मुंबई दि. २६: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी कौशल्य विकास व उद्योजकता, नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत स्किल सेंटर ऑन व्हील्स या संकल्पनेअंतर्गत फिरत्या बसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कौशल्य विभागाच्या आयुक्त निधी चौधरी उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी या बसची पाहणी करून बस विषयी माहिती जाणून घेतली. या […]
ठाकरे गटाकडून लोकसभेची तयारी सुरू, राज्यात ८०० किलोमीटरच्या ‘मातृतीर्थ ते शिवतीर्थ’ यात्रेची घोषणा
Maharashtra Politics : ठाकरे गटाकडून मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रेची घोषणा करण्यात आली असून या माध्यमातून ७० लाख लोकांपर्यंत पोहोचून लोकसभेचे १३ तर विधानसभेचे २७ मतदारसंघ कव्हर करण्याचे नियोजन आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात ८०० किलोमीटरची यात्रा काढण्यात येणार आहे. ३० जानेवारी ते ३ मार्च पर्यंत म्हणजे ३५ दिवस हे अभियान सुरू […]
महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार जाहीर
दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ नेते राम नाईक, संगीतकार प्यारेलाल यांच्यासह सहा जणांना पद्मभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, नेत्रतज्ञ मनोहर डोळे सह सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार नवी दिल्ली, 25 : सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज रात्री उशीरा करण्यात आली. प्रसिध्द साहित्यिक होर्मुसजी कामा यांना (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता) क्षेत्रात, अश्विन मेहता […]
Arif Mohammad Khan दोन मिनिटांतच संपवले
केरळच्या राज्यपालांनी दोन मिनिटांतच संपवले धोरणात्मक भाषण राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडीवर आपली नाराजी दर्शविणार्या अभूतपूर्व घडामोडीत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारच्या प्रथागत धोरणाचा शेवटचा परिच्छेद वाचून दोन मिनिटांपेक्षा कमी वेळेत आपले धोरणात्मक भाषण संपविले. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे सकाळी 9 वाजता विधानसभेत पोहोचले आणि त्यांनी 9.02 वाजताच्या आधी आपले धोरणात्मक […]
संतप्त Prakash Ambedkar काँग्रेसला खरमरीत पत्र
मुंबई :- गेल्या अनेक बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी किंवा देश स्तरावरील आघाडीपासून बाजूला ठेवून आता ऐनवेळी बैठकीचे निमंत्रण दिल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संतापले असून, काँग्रेसवर आगपाखड करणारे खरमरीत पत्र त्यांनी पाठविले आहे. निमंत्रण मिळूनही वंचितकडून गुरुवारी झालेल्या बैठकीत कोणीही सहभागी झाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या द़ृष्टीने महाविकास आघाडीकडून मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली […]
उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांचा गौरव.
मुलचेरा -: सन 2023 मधील मतदार यादीचे अद्यावतीकरण, तक्रारीचे निवारण, मतदार यादीमध्ये नवीन युवा मतदारांचे नाव नोंदणीसाठी राबविलेलेले नावीन्यपूर्ण उपक्रम या कार्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयामार्फत राष्ट्रीय मतदार दिनांचे औचित्य साधून उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.सदर राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाला […]
नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे एक दिवसीय राष्ट्रीय परीषद संपन्न
नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे एक दिवसीय राष्ट्रीय परीषद संपन्न शाश्वत विकास साधायचा असेल तर त्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे, शाश्वत विकासानेच शहरी व ग्रामीण भागातील दरी दुर होईल .- मा. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे प्रतिपादन मुलचेरा- नुकतेच नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील इमर्जिंग ट्रेंड्स NCETSTSD-2024 या विषयावर गोंडवाना […]