मुंबई, दि. १४ : जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ साठी देशभरातून अंदाजे 50 ते 60 हजार भाविक अपेक्षित आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी सर्व व्यवस्था चोखपणे करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे होणाऱ्या ‘अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३‘ बाबत सह्याद्री अतिथगृह येथील पूर्वतयारी […]
मुंबई
केंद्र सरकारच्या मदतीने वेळेत योजना पूर्ण करण्यास प्राथमिकता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जलशक्ती मंत्रालयाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने पथदर्शी भूमिका बजावावी – केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत मुंबई, दि. 14 : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये राज्याने प्रभावी आणि पथदर्शी भूमिका बजावावी, अशी अपेक्षा केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केली. दरम्यान, केंद्र सरकारकडून विविध योजनांच्या पूर्ततेसाठी भरीव सहाय्य मिळत असून, राज्यातील विविध योजना केंद्र […]
पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम
मुंबई, दि. 14 : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, सह निबंधक दुतोंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा द्या – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 14 :- झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा देण्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. अंधेरी पूर्व येथील के पूर्व वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार पराग आळवणी तसेच सर्व विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री श्री. लोढा म्हणाले […]
पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
ठाणे, दि. 14 (जिमाका) – देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, तहसीलदार राजाराम तवटे आदी उपस्थित होते. पंडित नेहरू यांचा जन्मदिन 14 नोव्हेंबर हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त मुख्यमंत्री […]
महिला खासदार, आमदार शिष्टमंडळाची राज्यपालांसोबत भेट
मुंबई, दि. 14 : राज्यातील महिला खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी खासदार फौजिया खान, खासदार जया बच्चन, खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार वंदना चव्हाण, आमदार मनीषा कायंदे, आमदार कु.अदिती तटकरे, आमदार सुमनताई पाटील, आमदार ऋतुजा लटके तसेच माजी आमदार विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.
इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांच्यासमवेत राज्य शासनाचा करार
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रम मुंबई, दि. 14: राज्य शासनाच्या विद्यार्थी समग्र विकास धोरणांतर्गत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी) सोबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सामंजस्य करार केला आहे. शासकीय शाळांमधून बालकांच्या आरोग्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा करारात समावेश आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या […]
ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेचे लोकार्पण ठाणे, दि. १३ (जिमाका) : ठाणेकरांना अंतर्गत वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यात, बायपास, ईस्टर्न फ्री वेचा विस्तार यांचा समावेश आहे. एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिका त्यासाठी काम करते आहे. त्यामुळे सगळे रस्ते वाहतूक कोंडी मुक्त होतीलच, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
अवजड वाहतुकीसाठी उड्डाणपूल फायदेशीर ठरेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपुलाचे लोकार्पण ठाणे – मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उड्डाणपुलामुळे हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा होणार असून प्रत्येक फेरीला त्यांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. एमएमआरडीएच्या वतीने […]
कल्याण डोंबिवलीमधील ४४५ कोटींच्या रस्त्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे- राज्यातील तसेच शहरातील रस्ते चांगले असतील तर त्या राज्याचा, त्या शहराचा विकास होतो. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एमएमआरडीएच्या विविध […]