महाराष्ट्रात ‘सिनार्मस’ची दोन टप्प्यात २० हजार कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. २९ :- महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. इंडोनेशियास्थित मे. सिनार्मस पल्प ॲण्ड पेपर कंपनीला आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील धेरंड येथे २८७ हेक्टर जमिनीचे वाटप पत्र […]
मुंबई
मंत्रिमंडळ निर्णय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार मुंबई, दि. २९ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात आज १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाने १४ विभागांचा सखोल […]
राज्य सरकारचा मोठा निर्णय :- पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ, लगेच अर्ज करा
राज्यातील पोलीस भरतीच्या उमेदवारांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली आणि त्यांनी पोलीस भरती अर्जाची मुदत १५ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून पोलिस भरतीसाठी अर्जाची मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे. 15 डिसेंबर 2022 पर्यंत उमेदवार पोलीस पदांसाठी […]
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नवी दिल्ली, दि. 28 : यंदाच्या 41 व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र भागीदार राज्य म्हणून सहभागी झाले होते. या मेळ्यात महाराष्ट्र दालनाला ‘भागीदार राज्य’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येथील प्रगती मैदानात 41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याची सुरूवात 14 नोव्हेंबरपासून झाली होती. याचा समारोप रविवारी 27 नोव्हेंबरला झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ‘महाराष्ट्र दालना’ ला पुरस्कार […]
महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, दि. 28 : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्काराने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2017, 2018 आणि 2019 साठीचे ‘शिल्प गुरू पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव रचना शहा, हस्तकला विकास आयुक्त व्यासपीठावर उपस्थित होते. उपराष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शिल्प गुरू’ तर […]
मुलुंड आयटीआय येथे मंगळवारपासून तंत्रप्रदर्शन
मुंबई, दि. 28 : मुलुंड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 29 व 30 नोव्हेंबर, 2022 रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या तांत्रिक विषयावर आधारित वस्तू व मॉडेलचे तंत्रप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन शालेय विद्यार्थी व नागरिकांना पाहण्यासाठी 29 व 30 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4.00 या वेळेत […]
नाशिकच्या अनाथ आश्रमातील लैंगिक छळ प्रकरणी चौकशी समिती स्थापन करून सात दिवसात अहवाल सादर करा – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 28 : नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्वरित एक समिती स्थापन करून विभागाला सात दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत. दिनांक 27 नोव्हेंबर रोजी एका वृत्तपत्रात, नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ […]
अभियंत्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई, दि. 28 : देशाच्या तसेच राज्याच्या विकासात अभियंत्यांचे मोलाचे योगदान आहे. शासकीय सेवेतील त्यांच्या सेवा नियम, भरती, पदोन्नती या मागण्यांबाबत निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी केली जाईल. अभियंत्यांच्या सर्व मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे राजपत्रित अभियंता संघटना महाराष्ट्र […]
सर्वांनी मिळून मुंबईचा विकास करूया – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२३-२४ च्या ४५० कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी मुंबई, दि. 28 :- मुंबई शहर जिल्ह्याच्या 2023-24 या आर्थिक वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) 450 कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सन 2022-23 च्या 315 कोटींच्या तुलनेत यावर्षीच्या आराखड्यात 135 कोटींची वाढ करण्यात आली आहे. पालकमंत्री […]
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदतीसाठी मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुख्यमंत्र्यांची वैद्यकीय सहायता निधी कार्यालयास भेट मुंबई, दि. 28 : वैद्यकीय उपचारासाठी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्यात येणारी आर्थिक मदत तातडीने उपलब्ध होण्यासाठी मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या कार्यालयास मुख्यमंत्र्यांनी दुपारच्या सुमारस अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी […]