मुंबई, दि. 11 :- शिक्षणक्षेत्र हे केवळ विद्यार्थ्यांची फॅक्टरी न बनता आपला देश शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रस्थानी राहण्याच्या दिशेने शासन प्रयत्न करीत असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. ‘टाइम टू ग्रो’ मीडिया आणि राज्य शासनाच्या संयुक्त […]
मुंबई
मंत्र्याच्या आदेशाला सचिवांनी दाखवली केराची टोपली,अन्न नागरी पुरवठा विभागातील पदोन्नती थांबविण्याचे नेमके गौडबंगाल तरी काय ?
कर्मचारी व अधिकारी संघटनेने दिला आमरण उपोषणाचा इशारा. मुंबई-अन्न, नागरी पूरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र : आस्था-६८२२/प्र.क्र.१६९/नाप-१५ दि. २९/०६/२०२२ अन्वये कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद अमरावती व नागपूर या सर्व सहाप्रशासकीय विभागातील पूरवठा निरीक्षक पदावरून निरीक्षण अधिकारी पदावर पदोन्नती देण्याबाबतची कार्यवाही सध्या अस्तित्वात असलेल्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार प्रशासकीय विभाग स्तरावरूनकरणेबाबत व […]
जनावरांना लम्पी चर्मरोग मुक्त करण्यासाठी काळजी व सुश्रुषा यावर ८० टक्के भर द्यावा – पशु संवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
बाभुळगाव, नेर, दारव्हा तालुक्यात केली जनावरांची पाहणी यवतमाळ, दि. १० जिमाका : महाराष्ट्रामध्ये लम्पी चर्मरोग हा साथरोग हाताळणे हे पशुसंवर्धन विभागासमोर मोठे आव्हान होते. मात्र पशुसंवर्धन विभागाने हे आव्हान चांगल्या पद्धतीने हाताळले. यापुढेही दोन महिने हे आव्हान हाताळण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी आणि डॉक्टरांनी जनावरांची काळजी व सुश्रुषा ८० टक्के आणि २० टक्के मेडिसिन यावर भर देऊन जनावरांना […]
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ४ हजार २२१ पशुपालकांच्या खात्यांवर १०.८५ कोटी रुपये जमा
मुंबई, दि. १० : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा ४ हजार २२१ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. १०.८५ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या ४ हजार २२१ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. १०.८५ […]
‘सक्षम महिला, सक्षम महाराष्ट्र’ उपक्रम राबवणार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. १० : महिलांच्या विविध तक्रारी तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरिता सक्षम महिला ,सक्षम महाराष्ट्र (जनसुनावणी) हा उपक्रम महिला व बालविकास विभागामार्फत दि.१ डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासकीय महिला वसतिगृहातील महिला व इतर गरजू महिलांसाठी कौशल्य विकास विभागामार्फत रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार असल्याची माहिती कौशल्य […]
कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया – मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. १० – ‘राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याअंतर्गत कोकणचा कॅलिफोर्निया करायचा आहे, मात्र कोकणचे कोकणत्व जपून’ असे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले. महासंस्कृती व्हेंचर्सच्या वतीने ‘कोकण सन्मान २०२२’ कार्यक्रमात मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते कोकणातील संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती आणि […]
२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 10 : राज्यात सुमारे २५ हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून यातून ७५ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळावे तसेच त्याद्वारे नवउद्यमी घडविण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे […]
गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 10 : राज्याच्या विकासात व आर्थिक प्रगतीत बंदरे क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा असून या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यास प्रोत्साहन देवून राज्यातील बंदरे विकासाला गती देण्यात येत असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. बंदरे विकास धोरण संदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सभागृह येथे लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी श्री भुसे बोलत होते. यावेळी […]
‘भारतीय नौदलाचे कार्य प्रेरणादायी’ – नौदलाचे कामकाज पाहून विधिमंडळ सदस्यांच्या भावना
मुंबई, दि. १० : भारतीय नौदलाचे कामकाज कसे चालते, युद्धनौकांचे संचलन कसे होते, युद्धनौकेवरील जवान कशा पद्धतीने खडतर परिस्थितीत कामकाज करतात, शोध आणि बचाव कार्यात भारतीय नौदल कशा पद्धतीने योगदान देते याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी आज विधानमंडळ सदस्यांना मिळाली. भारतीय नौदलाचा पश्चिम विभाग आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांच्यामार्फत […]
‘वन सेवा केंद्र’ सुरू करणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १० : सामान्य नागरिकांना “आपले सरकार” पोर्टलच्या माध्यमातून अनेक सेवा सुविधा उपलब्ध होत असतात. याच धर्तीवर वन विभागामार्फत केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व सेवा एका छताखाली देण्यासाठी ‘वन सेवा केंद्र’ सुरू करण्याचे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची बैठक आयोजित […]