पुणे, दि.१०: जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव […]
मुंबई
पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गोरेगाव येथे एसीटेक प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई दि 10 : मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून महाराष्ट्राला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आम्ही ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यावर भर आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. इकॉनॉमिक टाईम्सच्या आर्किटेक्चर,कन्स्ट्रकशन, इंजिनिअरिंग या गोरेगाव येथील एसटेक प्रदर्शनाचे […]
१२ ते २० नोव्हेंबरदरम्यान साजरा होणार पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव
जीवन सुंदर आहे ही यावर्षीच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाची संकल्पना मुंबई, दि. ९ : पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण पु.ल.देशपांडे यांचा ८ नोव्हेंबर हा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना आपली कला सादर करता यावी यासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव आयोजित करण्यात येतो. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत यावर्षी १२ ते २० नोव्हेंबर २०२२ […]
फॅशन स्ट्रीटवरील नुकसानग्रस्त दुकानदारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाखांची मदत – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 9- मुंबई शहरातील फॅशन स्ट्रीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपड्यांच्या बाजारातील 23 दुकानांना शनिवार दि. 5 नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या दुकानदारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मंत्री श्री.केसरकर यांनी आज फॅशन स्ट्रीट येथे जाऊन नुकसानग्रस्त दुकानांची पाहणी केली. […]
राज्याचे फुटवेअर आणि लेदर धोरण महिनाभरात बनणार – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ९ : फुटवेअर अँड लेदर क्लस्टर, स्टील पार्क, इलेक्ट्रिक व्हेईकल व फूड प्रोसेसिंगसाठी राज्यामध्ये मुबलक प्रमाणात संसाधने उपलब्ध असून फुटवेअर आणि लेदरसंदर्भात येत्या ३० दिवसांमध्ये धोरण निश्चित होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. आज फुटवेअर अँड लेदर, स्टील पार्क, इलेक्ट्रिक व्हेईकल व फूड प्रोसेसिंग क्षेत्रासाठी क्लस्टर उभारण्याबाबत उद्योगमंत्री श्री.सामंत […]
गुजरातमधील सिंह नोव्हेंबरअखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबई, दि. ९ :गुजरातमधील सक्करबाग येथील सिंहाची जोडी नोव्हेंबर अखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहे. २६ सप्टेंबर रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गुजरात दौऱ्याच्या वेळी गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी याविषयी चर्चा झाली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकारणाच्या […]
पायाभूत सुविधा पुरवितानाच कोळीवाड्यांचे सुशोभीकरण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि. ९: मुंबई शहराच्या सौंदर्यीकरणाबरोबरच शहरातील कोळीवाडे पर्यटनदृष्ट्या आकर्षणाचे केंद्रबिंदू व्हावेत यासाठी त्यांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात आणि त्यांचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई सौंदर्यीकरणाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह […]
दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची लवकरच निर्मिती; मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई, दि. ९- दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत […]
निवडणूक आयोगाने साधला तृतीयपंथी समुदायातील मतदारांशी संवाद
पुणे, दि. 9 : निवडणूक प्रक्रियेबाबतच्या तृतीयपंथी घटकांच्या समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच त्यांना आपले म्हणणे, समस्या मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव […]
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ ची ‘वॉकथॉन’ने सुरुवात
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन मुंबई उपनगर, दि. ९ : ‘मतदान हा आपल्याला मिळालेला घटनादत्त अधिकार असून या अधिकाराचा वापर आपण विचारपूर्वक व काळजीपूर्वक करायला हवा. मात्र, हा वापर करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे,’ अशी माहिती देतानाच मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी महाविद्यालयीन […]