मुंबई, दि. 15 : वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे जैव उद्यान उभारण्यात येणार असून यासाठीचा प्रकल्प आराखडा त्वरित तयार करावा, असे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील संत सतगुरु सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र पोहरादेवी जैव उद्यान संदर्भातील आढावा बैठक मंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अन्न व […]
मुंबई
अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांना देवत्व मिळाले; प्रत्येक आदिवासी हा बिरसा मुंडा होण्याची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
नाशिक, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : आपल्या असाधारण कर्तृत्वाने भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात देवत्व मिळाले, हेच कर्तृत्व अन् देवत्व प्रत्येक आदिवासी बांधवाच्या वाट्याला येण्यासाठी प्रत्येक आदिवासी बांधवाने बिरसा मुंडा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. येथील गोल्फ क्लब मैदानावर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय […]
नागपूर विधिमंडळ परिसर विस्तारीकरणासाठी प्रयत्नशील : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
हिवाळी अधिवेशनाचा विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापतींकडून आढावा नागपूर दि. 15 : नागपूर विधिमंडळ परिसराचे विस्तारीकरण करण्याबाबत प्रयत्नशील असून याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याचे स्थानिक प्रशासनाला निर्देशित करण्यात आले आहे. तसेच अधिवेशन काळात मर्यादित प्रवेश व सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन संसदेप्रमाणे मध्यवर्ती ‘बारकोड ‘ पद्धतीचा अवलंब करणार असल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज येथे दिली. नागपूरमध्ये […]
तज्ज्ञ मानसेवी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ
मुंबई, दि. 15 : पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था प्रवेशपूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. 11 वी, 12 वीच्या नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा, सशस्त्र सीमा बलासाठी मुलाखती याबरोबरच मैदानी खेळाचे प्रशिक्षणही देते. हे प्रशिक्षण देण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या तज्ज्ञ मानसेवी प्राध्यापकांचे मानधन आता एक हजार रूपये करण्यात आले […]
मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबवा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 15 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. हा उपक्रम मुंबई उपनगरातील सर्व वॉर्डमध्ये दिनांक १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबई शहरातील बालकांचे लसीकरण व […]
शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्याला प्राधान्य – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 15 : विद्यार्थी केंद्रस्थानी ठेऊन राज्यात शिक्षणाचा दर्जा उंचावण्याला शासनाचे प्राधान्य आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात आदर्श शाळा तयार करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. साम वाहिनी आयोजित ‘सामर्थ्य महाराष्ट्राचे – वेध भविष्याचा, मंथन विकासाचे’, या कार्यक्रमात राज्यातील शिक्षण क्षेत्राविषयी मंत्री श्री. केसरकर यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी ते बोलत […]
नेतृत्वगुण विकासासाठी ‘अभिरुप युवा संसद’ उपयुक्त – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 15 : संसदीय लोकशाहीच्या कार्यान्वयनात युवकांनी सहभाग घ्यावा या दृष्टीने सुरु केलेल्या अभिरूप संसद उपक्रमाच्या माध्यमातून देशाला परिपूर्ण नागरिक, उत्तम लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रात चांगले नेतृत्व लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. नेहरू युवा केंद्राच्या महाराष्ट्र व गोवा शाखेने युनिसेफ महाराष्ट्राच्या सहकार्याने मंगळवारी आयोजित पहिल्या राज्यस्तरीय युवा अभिरूप संसदेला संबोधित […]
‘दिलखुलास’ कार्यक्रमात जे. जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची १६ व १७ नाेव्हेंबर रोजी मुलाखत
बई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जे. जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार, दि. 16 व गुरुवार दि.17 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. मुंबई, भिवंडी, मालेगाव […]
गोवर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश
मुंबई, दि. १५ : गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे […]
बालभवनच्या उपक्रमांची व्याप्ती राज्यभर वाढविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 14 : सध्या मुंबईत होत असलेल्या बालभवनच्या उपक्रमांची व्याप्ती येत्या वर्षापासून राज्यभरात वाढविण्यात येणार असून त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केली. मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मुंबईच्या वतीने आयोजित विविध सहशालेय स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आली. […]