मुंबई, दि. १० : भांडूप पश्चिम येथे तात्पुरत्या स्वरूपात कंटेनर ठेवून मुंबई महापालिकेने नागरिकांना तात्काळ आरोग्य सुविधा द्याव्यात, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. भांडूप पश्चिम येथील के.ईस्ट वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार रमेश कोरगावकर तसेच सर्व विभागाचे अधिकारी आणि नागरिक […]
मुंबई
चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांचे दिवसभराचे भारनियमन रद्द
मुंबई, दि. 10 : चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा होणारे कृषीपंपांचे वीज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळात कृषीपंपांना सलग वीजपुरवठा करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुधीर मुनगंटीवार […]
सांस्कृतिक धोरण समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 10 : राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी एक समिती नुकतीच गठित करण्यात आली आहे. या समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या समितीत सांस्कृतिक कार्यमंत्री हे अध्यक्ष असतील, तर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे कार्याध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे […]
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास शैक्षणिक, उद्योग कर्ज योजनांसाठी केंद्राकडून निधी मुंबई, दि. १० – मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज तर उद्योग- व्यवसायासाठी मुदत कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून निधी कर्जस्वरुपात उपलब्ध झाला असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी महामंडळाकडे अर्ज करण्याचे […]
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे, दि.१०: जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव […]
पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गोरेगाव येथे एसीटेक प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई दि 10 : मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून महाराष्ट्राला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आम्ही ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यावर भर आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. इकॉनॉमिक टाईम्सच्या आर्किटेक्चर,कन्स्ट्रकशन, इंजिनिअरिंग या गोरेगाव येथील एसटेक प्रदर्शनाचे […]
१२ ते २० नोव्हेंबरदरम्यान साजरा होणार पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव
जीवन सुंदर आहे ही यावर्षीच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाची संकल्पना मुंबई, दि. ९ : पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण पु.ल.देशपांडे यांचा ८ नोव्हेंबर हा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना आपली कला सादर करता यावी यासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव आयोजित करण्यात येतो. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत यावर्षी १२ ते २० नोव्हेंबर २०२२ […]
फॅशन स्ट्रीटवरील नुकसानग्रस्त दुकानदारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाखांची मदत – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 9- मुंबई शहरातील फॅशन स्ट्रीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपड्यांच्या बाजारातील 23 दुकानांना शनिवार दि. 5 नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या दुकानदारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मंत्री श्री.केसरकर यांनी आज फॅशन स्ट्रीट येथे जाऊन नुकसानग्रस्त दुकानांची पाहणी केली. […]
राज्याचे फुटवेअर आणि लेदर धोरण महिनाभरात बनणार – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ९ : फुटवेअर अँड लेदर क्लस्टर, स्टील पार्क, इलेक्ट्रिक व्हेईकल व फूड प्रोसेसिंगसाठी राज्यामध्ये मुबलक प्रमाणात संसाधने उपलब्ध असून फुटवेअर आणि लेदरसंदर्भात येत्या ३० दिवसांमध्ये धोरण निश्चित होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. आज फुटवेअर अँड लेदर, स्टील पार्क, इलेक्ट्रिक व्हेईकल व फूड प्रोसेसिंग क्षेत्रासाठी क्लस्टर उभारण्याबाबत उद्योगमंत्री श्री.सामंत […]
गुजरातमधील सिंह नोव्हेंबरअखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबई, दि. ९ :गुजरातमधील सक्करबाग येथील सिंहाची जोडी नोव्हेंबर अखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहे. २६ सप्टेंबर रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गुजरात दौऱ्याच्या वेळी गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी याविषयी चर्चा झाली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकारणाच्या […]