मुंबई
महाराष्ट्रात राबवणार ‘ऑल वूमेन टूरिझम’ संकल्पना, राज्य सरकारचा मोठा निर्णय.
महाराष्ट्रात लवकरच ‘ऑल वूमेन टूरिझम’ संकल्पना राबवली जाणार आहे. ‘सब कूछ महिला’ असे या संकल्पनेचे स्वरूप आहे. महिलांसाठी सहली आयोजित करणाऱ्या संस्थांचे मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. राज्यातील पर्यटन सुविधांचा मेक ओव्हर केला जाईल. पर्यटनस्थळी महिलांच्या सहलींचे आयोजन, त्यांच्या गाड्यांचे चालक-वाहक, गाईडही महिला, तसेच, मुक्कामाच्या ठिकाणीही महिला पोलिसांची सुरक्षा, अशी ही […]
सॅफ्रन कंपनी’चा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानतंर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “एकनाथ शिंदेंनी
टाटा एअरबस प्रकल्प’ गुजरातमध्ये गेल्यानंतर सत्ताधारी शिंदे गट-भाजपा आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. टाटा एअरबससह आतार्यंत चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. असे असताच नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही हैदराबादला गेल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, याच चर्चेवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या समस्येवर चर्चा करण्यासाठी तसेच योग्य तोडगा […]
‘वेदांता फायरफॉक्स’, ‘टाटा-एअरबस’नंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?
११८५ कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प नागपुरातून हैदराबादला, ६०० जणांचा रोजगार गेला? ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत. त्यातच आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेल्याचं समजत आहे. त्यामुळे ‘वेदांता फायरफॉक्स’ आणि ‘टाटा-एअरबस’ यानंतर आता […]
नागपुरात उघड्यावर अन्न फेकल्यास होणार एक लाखापर्यंत दंड
नागपूर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी शिल्लक अन्न टाकल्यास महानगरपालिका हरित लवाद कायद्याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठवला जाणार असा निर्णय घेतला आहे. नागपूर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी शिल्लक अन्न टाकल्यास महानगरपालिका हरित लवाद कायद्याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठवला जाणार असा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर किंवा अन्य उघड्या ठिकाणी अन्न टाकण्यात येणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी महानगरपालिकेने शोध […]
नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन
मुंबई:-राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू […]
झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बांधकाम व्यावसायिकांना सूचना
मुंबई, दि. 18 :- गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन आगामी २ – ३ वर्षांमध्ये मुंबईत कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही, या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बांधकाम व्यावसायिकांना केले. सर्वांना घर […]
मुंबईतील जपान दूतावासातील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
मुंबई, दि. १७: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जपान अग्रेसर असून महाराष्ट्राच्या कृषी, अन्न प्रक्रिया, वैद्यकीय तसेच नागरी सुविधांच्या क्षेत्रात या आधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य घेतले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर मुंबईतील जपानचे वाणिज्यदूत यासुकाटा फुकाहोरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित […]
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्दचा आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्प सर्वोत्तम, देशातील पथदर्शी असा ठरावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रकल्पासाठी जलसंपदा, पर्यटन विभागाचा सहकार्य करार होणार मुंबई, दि. 15 : – भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या जलाशयात आंतरराष्ट्रीय दर्जाचा, देशातील सर्वोत्तम आणि पथदर्शी असा जलपर्यटन प्रकल्प साकारण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात समिती सभागृहात जलपर्यटन प्रकल्पाबाबत बैठक आज झाली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार नरेंद्र भोंडेकर, […]