ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कारवाई करावी – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

शिवभोजन थाळीची गुणवत्ता तपासणीसाठी पथक तयार करणार शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ – छगन भुजबळ मुंबई, : शिवभोजन केंद्रांबाबतच्या तक्रारी लक्षात घेता नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. मंत्रालयातील दालनात शिवभोजन थाळी योजनेसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण करावा – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे शिक्षकांना आवाहन

मुंबई, कोरोनामुळे मागील दोन वर्षे सर्वांसाठीच आव्हानात्मक होती. शिक्षण क्षेत्रही त्यापासून अलिप्त राहू शकले नाही. तथापि आता दहावी व बारावीच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा होत असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण करावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

MHT CET २०२२ प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरु – MHT CET Online Registration

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी-२०२२ ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरीता उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज दि. १० फेब्रुवारी, २०२२ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. अर्ज सादर करण्याकरिता आणि अधिक माहितीसाठी राज्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील विविध राज्यांच्या मंत्रीगटाकडून जीएसटी चोरी रोखण्यासह संकलनातील त्रूटी दूर करण्यासाठी सात शिफारशी सादर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा सहभाग असलेल्या स्थायी मंत्रीगटाच्या दुसऱ्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. 1० :- जीएसटी चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रीक प्रणालीचा प्रभावी वापर, व्यावसायिकांच्या पडताळणीसाठी कार्यस्थळाची प्रत्यक्ष पाहणी, यंत्रणेद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारांची प्रत्यक्ष तपासणी, बोगस व्यावसायिक नोंदणी रोखण्यासाठी प्रत्यक्ष तपासणी, जीएसटीएन नोंदणीवेळी वीजग्राहक क्रमांक अनिवार्य करणे, करदात्यांच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘दोष धातू मल विज्ञान’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 9 : प्रसिद्ध स्त्रीरोग तसेच आयुर्वेद तज्ज्ञ डॉ हणमंतराव पालेप यांनी लिहिलेले ‘दोष धातू मल विज्ञान‘ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. कार्यक्रमाला नागालॅन्डचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य व पॉप्युलर  प्रकाशनचे रामदास भटकळ उपस्थित होते. भारतीय आरोग्य चिकित्सा पद्धती तसेच तत्वज्ञानात प्रत्येक गोष्टीचा समग्र आणि साकल्याने विचार केला आहे. देशातील ऋषीमुनींनी गहन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार मुंबई, दि. 9 : बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपत आहे. परंतू राज्यात कोविडची आपत्ती त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सदस्य संख्येत केलेली वाढ आणि त्यामुळे झालेली प्रभागांची पुनर्रचना […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

पर्यावरणपूरक विचारांची पेरणी करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करूया – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. 9 – पाणी, शेती, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, आपत्ती, महिला आणि हवामान बदल आदी विविध क्षेत्रांवर वातावरणीय बदलांचे परिणाम दिसून येत आहेत. यावरील उपाययोजनांबाबत पर्यावरणपूरक विचारांची ‘पेरणी’ करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. डॉ.गोऱ्हे यांच्या पुढाकाराने संपर्क आणि स्त्री आधार केंद्र संस्थांमार्फत आयोजित […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

१२वी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन डाउनलोड करा – Online Download HSC Board Exam Hall Ticket

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/ प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा मार्च – एप्रिल २०२२ साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. १२वी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेला अद्ययावत माहिती मिळणार – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. ९ : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नव्याने करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेला अद्ययावत माहिती मिळेल जनतेने संकेतस्थळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. मंत्री महोदय यांचे निवासस्थान सिंहगड येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाचे उद्घाटनप्रसंगी मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महिलांच्या सक्षमीकरणासोबतच सुरक्षित वातावरणही महत्त्वाचे – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

नागपूर, दि. 08 : महिलांचे आरोग्य, सक्षमीकरणासोबतच सुरक्षिततेलाही प्राधान्य असायला हवे. राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध झाला असून सुधारित महिला धोरण कसे असावे, यासंदर्भात नागरिकांनी आपले अभिप्राय कळविणे आवश्यक आहे. यासंदर्भात चर्चा करूनच धोरण ठरविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य सुधारित महिला धोरणाच्या अनुषंगाने विभागीय स्तरावरील […]