नागपूर, दि. १९ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई येथील विश्रामगृहामधील 6 कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांना राखीव ठेवण्यात यावेत तसेच त्याचे आरक्षण विधिमंडळ सचिवालयामार्फत करण्यात यावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या मागण्यांबाबत आज विधानभवनाथ बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानमंडळाचे माजी सदस्य जोगेंद्र कवाडे, रामकृष्ण पाटील, प्रकाश गजभिये, रामभाऊ […]
मुंबई
विधानसभा कामकाज
उद्योग, शेती, ऊर्जा क्षेत्राला बळकटी देत विदर्भाचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर, दि. २० : विदर्भातील सुरजागड येथे १४ हजार कोटी आणि ५ हजार कोटी रुपयांचे दोन नवीन प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर या भागात १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला आणखी एक स्टील प्रकल्प गडचिरोली येथे आणला जाणार आहे. विदर्भासाठी २० […]
जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करू
अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन नागपूर, दि. 20 : कायदा व सुव्यवस्था राखण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे. राज्याचे पोलीस दल जागरूक असून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम चोखपणे पार पाडीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले. अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत सविस्तर चर्चा होऊन शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाच्या माध्यमातून आपण […]
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित
पुढील अधिवेशन २६ फेब्रुवारी रोजी मुंबईत नागपूर, दि २० : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत, तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर, दि. २० : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील अनेक विषयावर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा सुरू होती. या अधिवेशनात सकारात्मक व जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री […]
जुन्नर तालुक्यातील डिंगोरेनजीकच्या अपघातातील आठ प्रवाशांचा मृत्यू दु:खद – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांची मृतांना श्रद्धांजली नागपूर, दि. १८ : अहमदनगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ ट्रक, पिकअप टेम्पो आणि रिक्षा यांची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृत प्रवाशांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त […]
नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नक्षलवाद प्रतिबंध राज्यस्तरीय समितीची बैठक नागपूर, दि. १८ : गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. डावी कडवी विचारसरणीबाबत राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसूत्री कृती यंत्रणा सरंचनेनुसार गठीत राज्यस्तरीय समितीची बैठक आज येथे झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. […]
बाजारगाव स्फोट दुर्घटनास्थळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
मृत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण; मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन केले सांत्वन नागपूर, दि. १७ : नागपूर बाजारगाव येथे स्फोट झालेल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, विशेष पोलिस महानरीक्षक यांच्यासह एनडीआरएफ व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून दुर्घटना आणि मदतकार्याची माहिती घेतली. मदतकार्य […]
बाजारगाव दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन
नागपूर दि. १७ : नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्री इंडिया लिमिटेडच्या परिसरातील दुर्घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. रात्री सव्वा नऊच्या सुमारास नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथूनच मुख्यमंत्री दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण
जखमी रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेमुळे चार रुग्णांचे वाचले जीव नागपूर, दि. १७ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांना दिले. मुंबईहून नागपुरला परतल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी […]