मुलचेरा :- आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाष चंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा जि गडचिरोली येथील कार्यरत प्राध्यापक डॉ. ललितकुमार शनवारे यांना सोसायटी फॉर टेक्नॉलॉजीकली ॲडव्हान्स मटेरियल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल अवॉर्ड आदर्श शिक्षक पुरस्कार राजकमल बाबुराव तिडके महाविद्यालय मौदा येथील झालेल्या नॅशनल कॉन्फरन्स मध्ये प्रदान करण्यात आला […]
मुंबई
श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याण मार्गातून मानवतेची सेवा केली – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
उपराष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईत श्रीमद् राजचंद्र स्मारकाचे अनावरण व मार्गाचे नामकरण संपन्न मुंबई, दि. २७ : भारत हा संस्कृतीचा केंद्रबिंदू असून जगभरात भारताची ओळख ही या संस्कृतीमुळे असून हा वारसा टिकविण्यात, वाढविण्यात देशातील अनेक संत महापुरुषांचा हातभार आहे. प्रत्येक कालखंडात या संतांनी या भूमीला पवित्र करण्याचे काम केले असून त्यामध्ये श्रीमद् राजचंद्रजी यांचाही समावेश आहे. श्रीमद् राजचंद्रजी […]
शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले, आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी मात्र तुमची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन ठाणे, दि. 27 (जिमाका) : शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले आहे. आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे […]
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघात प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १५ इंटरसेप्टर वाहने महामार्ग पोलिसांना हस्तांतरित
ठाणे दि. २७ (जिमाका) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर विहित वेगमर्यादेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्फे एकूण १५ इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली. येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी झेंडा दाखविल्यानंतर सर्व वाहने समृद्धी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली. ७०१ […]
प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन कटिबध्द – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि.२७ (जिमाका) : स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते चांगल्या दर्जाचे असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते आज पूर्ण होत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते 40 लाख गरिबांना घरे देणे, त्यातून एसआरए योजना सुरू झाली. याच माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हे शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्री गुरु नानक देव यांना अभिवादन
प्रकाशदिनाच्या दिल्या शुभेच्छा मुंबई,दि. २७ :- शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. नानकदेव यांचा जन्मोत्सव प्रकाशदिनाच्या मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘गुरू नानकदेव यांनी गुरुभक्तीला सर्वश्रेष्ठ स्थान दिले.त्यांनी प्रेम, सद्भावना आणि बंधुभाव यांची शिकवण दिली. त्यांचा शांती आणि मानवतेचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. नानकदेव यांच्या […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
मुंबई दि. 26 : संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव विकास खारगे,सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र.रा. पेटकर तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदना
मुंबई दि. २६ : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमास मुंबई शहर […]
जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आर्ट ऑफ लिव्हिंगसमवेत जलयुक्त शिवार आणि नैसर्गिक शेतीचा सामंजस्य करार मुंबई, दिनांक २६ : जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे आज व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. हॉटेल ताज येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी […]
वसमत शहरातील विकास प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई,दि.23 : वसमत (जि.हिंगोली) शहरातील पाणीपुरवठा योजना, भुयारी गटारे, बढा तलावाच्या कामाबाबतचे विकास प्रकल्प संबंधित यंत्रणेने समन्वयाने तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले. मंत्रालयात वसमत शहरातील विविध विकास प्रकल्पाबाबत आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री श्री.पवार बोलत होते. बैठकीला आमदार चंद्रकांत नवघरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, नगरविकास विभागाचे […]