मराठवाड्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहीम; मिशनमोडवर काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील […]
मुंबई
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांनीही […]
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वानखेडे स्टेडियमवरील सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दिमाखात अनावरण ‘संघर्षातून विजय कसा मिळवावा याचे मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर हे प्रतीक आहेत. त्यांचा पुतळा उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत ठरेल,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. विख्यात क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या भव्य पुतळ्याचे आज वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते […]
मातृभूमीविषयी प्रेम आणि संस्कृतीविषयी आदर महत्त्वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून केंद्र सरकार आणि राज्य शासन काम करीत आहे, यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. पायाभूत सुविधा, इमारती, मोठे प्रकल्प, भौतिक सुविधा याबरोबरच आपल्या मातृभूमीविषयी प्रेम, संस्कृतीविषयी आदर तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळेच ‘माझी माती माझा देश अभियान’ हे देशासाठी शहीद होणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे, असे प्रतिपादन […]
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रुपयांचे ऑनलाईन वितरण
केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रुपयांचे […]
भारत २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी सज्ज – पंतप्रधान नरेंद्र मोदी
चार दशकानंतर भारतात होणाऱ्या १४१ व्या अधिवेशनाचे उद्घाटन मुंबई, दि. १४ :- ‘खेळ हे पदक जिंकण्यासाठी नसतात. तर खेळातून हृदय जिंकले जाते.खेळात जगाला जोडण्याची क्षमता असते असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत २०३६ मधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनासाठी सज्ज असल्याचे निःसंदिग्ध अशी ग्वाही दिली. त्यांनी २०२९ मध्ये होऊ घातलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेच्या संयोजनाची तयारी दर्शवली. आंतरराष्ट्रीय […]
लोकसभा निवडणुकांची पूर्वतयारी सुरू; सर्व मतदारसंघांचा घेण्यात आला आढावा
आगामी लोकसभा निवडणुकांची पूर्व तयारी राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. तसेच राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण एक जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुका-2024 मध्ये होणार असून त्या दृष्टीने राज्यातील मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांच्या […]
अहेरी नगरीत पहिल्यांदाच हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा
मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त खास कार्यक्रम स्नेहा लॉन येथील भव्य पटांगणात 20 ऑक्टोबर रोजी आयोजन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त अहेरी राजनगरीत पहिल्यांदाच *हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा […]
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 153 जागांसाठी भरती
Maharashtra State Cooperative Bank, MSC Bank Recruitment 2023 (MSC Bank Bharti 2023) for 153 Trainee Junior Officer, Trainee Clerk & Steno Typist Posts. जाहिरात क्र.: 02/MSC Bank/2023-2024 Total: 153 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी 45 2 प्रशिक्षणार्थी लिपिक 107 3 लघुलेखक (मराठी) 01 Total 153 शैक्षणिक पात्रता: […]