पुणे, दि. 24 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या 670 झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्पाची माहिती घेत शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारे काम अधिकाऱ्यांनी करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय चौबे, सुनील नहार आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री.पवार […]
मुंबई
नाग नदीच्या पुरामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी
दहा हजार घरांचे नुकसान ; घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य भिजले नागपूर दि. 24 : नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात येईल, तसेच नुकसानीसंदर्भात पंचनाम्याला दुपारी सुरुवात करून तत्काळ मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्ण वेध घेणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन
ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामगिरी मुंबई, दि. २५ : – आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंह पनवर, ऐश्वर्य सिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप […]
चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
‘मास्टर स्ट्रोक’ मराठी क्रीडा पाक्षिकाचे प्रकाशन पुणे, दि. 25 : महाराष्ट्रातील खेळाडू देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावेत यासाठी ‘मास्टर स्ट्रोक’ क्रीडा पाक्षिकाच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार करण्यास मोलाचे योगदान व्हावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. ‘मास्टर स्ट्रोक’ या मराठी क्रीडा पाक्षिकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पाक्षिकाचे संपादक माधव दिवाण, विश्वस्त […]
पंतप्रधान श्री मा नरेंद्रजी मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिम्मित ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे रुग्णांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने फळ वाटप करण्यात आले
मुलचेरा :- देशाचे पंतप्रधान श्री मा नरेंद्रजी मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिम्मित मुलचेरा भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष श्री प्रकाशजी दत्ता यांच्या नेतृत्वात ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे ४८ रुग्णाना फळ – बिस्कीट वाटप करण्यात आले. याप्रसंगी बादल शाहा जिल्हा सचिव, सुभाष गणपती जिल्हा सचिव,संजीव सरकार युवा मोर्चा तालुका अध्यक्ष,उत्तम शर्मा व्या आ ता अध्यक्ष,सौ.प्रभाती […]
शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी शेतकरी योजना ठरतेय फायद्याची तालुका कृषी अधिकारी विकास पाटील
आदिवासी शेतकऱ्यांसाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, इनवेल बोअरिंग व पंपसंच, वीजजोडणी तसेच सूक्ष्म सिंचन संचअंतर्गत तुषार संच किंवा ठिबक सिंचन संच, एचडीपीई किंवा पीव्हीसी पाइप्स […]
गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, मंडळांना दिलासा मुंबई, दि. 14 :- उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे गत दहा वर्षांत सर्व नियम, कायद्यांचे पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांना […]
अंध व्यक्तींच्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ
दिव्यांगांना सहानुभूती नको; समाजाचे सहकार्य व आशीर्वाद हवेत – राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि. 14 : दिव्यांग व्यक्तींची ज्ञानेंद्रिय अधिक तल्लखपणे काम करतात. अनेक बाबतीत ते सामान्य व्यक्तींपेक्षा अधिक चांगले काम करतात. दिव्यांग व्यक्तींना समाजाकडून सहानुभूती नको, तर त्यांना सहकार्य आणि आशीर्वाद हवेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. राज्यपालांच्या हस्ते अंध व्यक्तींच्या […]
‘जैन धर्म हितेशी’ सन्मानाने राज्यपाल रमेश बैस सन्मानित
‘पर्युषण’ हा आंतरिक शुद्धीचा सण – राज्यपाल मुंबई, दि. 14 : राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी (दि. १३) श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर या संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महापर्व – २०२३’ कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्संग श्रवण केले. तसेच उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मिशनचे गुरुदेवश्री राकेशजी यांच्या हस्ते राज्यपालांना झारखंड येथील पवित्र जैन तीर्थस्थळ ‘श्री सम्मेत शिखरजी’ पर्यटन स्थळ होण्यापासून वाचवल्याबद्दल ‘जैन धर्म हितेशी’ उपाधी देऊन […]
नवीन आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. १४ :- राज्यातील वरुड, मोर्शी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तुमसर, पुसद, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, वसमत, गंगापूर, खुलताबाद, औंढा नागनाथ, अकोले, संगमनेर, सुरगाणा, शिरूर, आंबेगाव, मंचर, बारामती, खेड, मोहोळ, अहमदनगर आदी तालुक्यातील नवीन प्राथमिक तसेच उप आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरच, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. रुग्णालयांना वैद्यकीय चाचणी आणि अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध करावी. औषधांचा पुरवठा नियमित सुरु राहील, याची दक्षता घ्यावी. रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री […]