मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती व प्रसारणमंत्र्यांचे मानले आभार मुंबई, दि. १५ – आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने मागे घेतला असून या केंद्रावरुनच यापुढे बातमीपत्रे प्रसारित होणार असल्याचे आदेश प्रसारभारतीने आज जारी केले आहेत, या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर […]
मुंबई
‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत राज्यातील ३५ लाख लाभार्थ्यांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर जिल्ह्यामध्ये २ लाखांपेक्षा अधिक लाभार्थी पालघर दि. 15 : ‘शासन आपल्या दारी’ या अभियानामध्ये रोजगार मेळावादेखील घेण्यात आला आहे. 2 ते 3 हजार तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत विविध योजना पोहोचविल्या आहेत. राज्य शासनाने वर्षभरात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोणालाही वैयक्तिक लाभ होईल असा निर्णय या […]
अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
म्हाडाच्या सन २०२० गिरणी कामगार सोडतीतील पात्र गिरणी कामगार, वारसांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप मुंबई, दि. १५ जून, २०२३:- गिरणी कामगारांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. […]
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती
Department of Animal Husbandry Government of Maharashtra, AHD Maharashtra Recruitment 2023, Maharashtra Pashu Savardhan Vibhag Bharti 2023 for 446 Livestock Supervisor, Senior Clerk, Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Laboratory Technician, Electrician, Mechanics, & Vaporizers Posts. जाहिरात क्र.: NGO-5(4)/(प्र.क्र.1110/291/2023/पसं-1,पुणे-67 Total: 446 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पशुधन पर्यवेक्षक 376 2 […]
“शासन आपल्या दारी” योजनेतून जिल्ह्यातील एक लाख लाभार्थ्यांना लाभ देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी दि. 25 : “शासन आपल्या दारी” या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान एक लाख लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील “शासन आपल्या दारी” या लोकाभिमुख योजनेच्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनीकर्म मंत्री […]
विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी, दि.२५ -: रत्नागिरी येथील शासकीय उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कौशल्य विकास वास्तूच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. मुख्यमंत्री शिंदे यांनीही कोणतेही सुरक्षा कारण न सांगता विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी काढले. त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. हाच प्रकार लोकमान्य टिळक स्मारक विभागीय शासकीय ग्रंथालयातही दिसून आला. या ठिकाणी […]
शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी दि. 25 : शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू हा ऐतिहासिक ठेवा आहे. ही वास्तू राज्याच्या सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मरणार्थ कोकण वासियांकरीता राज्य शासनाद्वारे 20 ऑक्टोबर 1976 रोजी सुरु करण्यात आलेल्या या जुन्या शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या इमारतीचे नुतनीकरण, सुशोभिकरण व […]
राज्यात प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महापालिका आणि सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या प्रकल्पांचे लोकार्पण सोलापूर, दि. २५ (जि.मा.का.)– राज्यात प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असून १० लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महानगरपालिकेच्या हुतात्मा स्मारक मंदिर येथे महापालिका व सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या प्रकल्पांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]
सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे त्यांचे स्मारक व्हावे- राज्यपाल रमेश बैस
मेजर कौस्तुभ राणे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार मरणोत्तर प्रदान मुंबई, दि. 22 : “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे. तसेच ‘ने मजसी ने’ व ‘जयोस्तुते’ या सावरकरांच्या काव्यरचना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यात”, अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे 2023 वर्षाचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर […]
‘पुस्तकांचे गाव-भिलार’ हे देशासाठी आदर्श गाव- राज्यपाल रमेश बैस
सातारा दि. २२ – महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याची भावना राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली. महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असता राज्यपाल श्री. बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, भिलारचे […]