ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ब्रेकिंग ! – आता तांत्रिक शिक्षणदेखील घेता येणार मराठीतून – शिक्षणमंत्र्यांनी मोठी घोषणा

 येत्या जूनपासून नवीन शैक्षणिक धोरण सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे तांत्रिक शिक्षण देखील मराठीत दिले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज दिली. इंजिनियरिंग, मेडिकलचे शिक्षण मराठीत दिले जाणार असल्यामुळे याचा फायदा मराठी मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलांना होणार आहे.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

नवी दिल्ली, ९: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊ येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री श्री. शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज रात्री त्यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर मुख्यमंत्री श्री. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मुंबई दि १०: अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. तसेच सर्व जखमींवर शासकीय खर्चाने व्यवस्थित उपचार करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत ७ भाविक ठार तर २३ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी, मदतीबाबत मंत्रिमंडळात लवकरच निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी; अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश नाशिक, दि. 10 (विमाका वृत्तसेवा) : बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे या गावामध्ये बिगरमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाची माहिती […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी; शेतकऱ्यांना दिलासा!

मुंबई, दि. १०: राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णयदेखील काढण्यात आला. दि.४ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘महाराष्ट्र भूषण’- २०२२ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

इतिहासात नोंद घेतली जाईल असा सोहळा करुया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलिबाग, दि. १० (जिमाका) :- महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवार, दि. १६ एप्रिल २०२३ रोजी कॉर्पोरेट पार्क, खारघर, नवी मुंबई येथे आयोजित सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढणार आहे. म्हणूनच आपण […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत घेतले प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन

नवी दिल्ली, ९ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अयोध्या शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यासह स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अयोध्येतील मंदिरात जाऊन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत घोषणा नवी दिल्ली, ९ : प्रभू श्री रामचंद्र यांचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे हे दोन दिवसीय उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी अयोध्येत प्रभू श्री रामच्रंद्र यांच्या जन्मस्थळी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नौसेनेच्या मुख्य ध्वज अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. ९ : भारतीय नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे नवनियुक्त मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे अतुट नाते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शरयू नदीच्या तिरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती नवी दिल्ली, ९ : महाराष्ट्राचे देशातील अन्य राज्यांसोबत नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत, त्यातही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते अतुट असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत शरयू नदीच्या तीरी केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी शरयू नदीवरील विशेष महाआरती करण्यात आली. मुख्यमंत्री श्री. शिंदे हे दोन दिवसीय […]