मुंबई, दि. ४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळात अलिकडेच समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांसह मंत्रालयातील जीजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. मंत्री सर्वश्री छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील तसेच कु. आदिती तटकरे यांनीही महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्प […]
मुंबई
वर्षपूर्तीनिमित्त निर्णय पुस्तिकेचे व लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन
मुंबई, दि. ४ : राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका “पहिले वर्ष सुराज्याचे” आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य या मासिकाचे प्रकाशन आज करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, वरिष्ठ सनदी अधिकारी […]
मंत्रिमंडळ निर्णय : मंगळवार, दि. ४ जुलै २०२३
राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती हरित हायड्रोजन धोरण जाहीर, ८ हजार ५०० कोटीस मान्यता नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ८ हजार ५६२ […]
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर येथे आगमन; गडचिरोलीत पदवीदान समारंभ, तर कोराडीत सांस्कृतिक भवनाचे होणार लोकार्पण
नागपुरात प्रथम आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत नागपूर, दि. 4 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी 4 जुलैला सायंकाळी नागपुरात आगमन झाले. 5 जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर […]
समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर मुंबई, दि. १ – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण […]
बलशाली भारताच्या निर्मितीचा मार्ग वस्तू व सेवा करामुळे सुलभ होईल – राज्यपाल रमेश बैस
केंद्रीय वस्तू व सेवा कर कायद्याच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम मुंबई, दि. १ : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवा कराचे ‘गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स’ असे वर्णन केलेले आहे. हा कर प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणाऱ्यांना बक्षीस देतो, तर अप्रामाणिकांना शिक्षा करतो. या करामुळे बलशाली आणि आत्मनिर्भर भारताचा मार्ग सुलभ बनेल, असे उद्गार राज्यपाल रमेश […]
पायाभूत सुविधा आणि परदेशी गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण संपन्न ठाणे, दि. २ (जिमाका) : पायाभूत सुविधा, परदेशी गुंतवणूक आदी कामांमुळे महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकावर आले आहे. राज्याच्या हितासाठी व सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी हे शासन काम करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. […]
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राजभवनात शपथविधी संपन्न; राज्यपाल रमेश बैस यांनी दिली पद व गोपनीयतेची शपथ मुंबई, दि. २ : विधानसभेचे सदस्य अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. […]
समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ञांमार्फत अभ्यास करुन उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस बुलढाणा, दि १ : समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजा नजीक खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात रात्री दोन वाजता झाला. यात 25 जणांचा मृत्यू […]
सातारा जिल्ह्यातील पिंपरीतांब गावातील भागडवाडीतील गरीब वृद्ध दाम्पत्याला मदतीचा हात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा; पावसाळ्यात दाम्पत्याचे अन्यत्र पुनर्वसन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश सातारा :- आपल्या मूळ गावाकडून मुंबईकडे परतणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अचानक एका गावाजवळ थांबतो…निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत त्यांना माहिती मिळते….आपल्या पदाचा, राजशिष्टाचाराचा बाऊ न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद साधतात..आपुलकीने विचारपूस करतात…जिल्हा प्रशासनाला त्या वृद्ध दाम्पत्याच्या पुनर्वसनाचे निर्देश […]