ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘ग्रीन फिल्ड महामार्गा’मुळे अहमदनगर लॉजिस्टिक कॅपीटल बनणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अहमदनगर शहरातील ३ किलो मीटर लांबीच्या चौपदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण येत्या काळात ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना अहमदनगर दि. 19 नाव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा):- ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार असून रोजगार वाढणार आहे. जिल्हा लॉजिस्टिक कॅपीटल बनणार आहे. येत्या काळात जिल्ह्यात प्रस्तावित ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना मिळेल. असे प्रतिपादन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांच्या निधनाने इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी अभिनेत्री गमावली – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शोकसंवेदना

मुंबई, दि.१९: : अनेक दशकं हिन्दी सिनेसृष्टी आणि दूरदर्शन वर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांच्या निधनाने कला आणि चित्रपट क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तबस्सुम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तबस्सुम म्हणजे हास्य चैतन्य आणि सुगंध. अगदी नावाप्रमाणे आयुष्य व्यतीत करुन इतरांना “फूल खिले हैं गुलशन गुलशन” […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली

मुंबई, दि. 19 : तबस्सुम यांच्या निधनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका आणि मुलाखतकार आपण गमावली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, बाल कलाकार म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या तबस्सुम यांनी रसिकांच्या मनात आपले स्वतःचे एक विशिष्ठ स्थान निर्माण केले होते. एक चांगल्या मुलाखतकार म्हणून त्यांनी अनेक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बेबी तबस्‍सुम यांना श्रद्धांजली

‘सदाबहार, चतुरस्त्र कलायात्री गमावली मुंबई, दि. 19 : आपल्या सदा हसतमुख आणि प्रसन्न अभिनयाने चित्रपट, दूरचित्रवाणी या क्षेत्रात अमीट छाप सोडणारी चतुरस्त्र कलायात्री गमावली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री बेबी तबस्‍सुम यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय चित्रपट आणि पुढे दूरचित्रवाणी क्षेत्रात देखील आपल्या चतुरस्त्र कामगिरीने बेबी तबस्‍सुम यांनी एक काळ गाजवला. बालकलाकार ते मार्गदर्शकाच्या भूमिकेतील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सामाजिक न्यायाची भावना वृद्धिंगत होण्यासाठीच्या प्रयत्नातून प्रगल्भ, कणखर आणि सुदृढ महाराष्ट्र घडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अहमदनगर जिल्ह्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दृरदृष्यप्रणालीद्वारे लोकार्पण अहमदनगर, दि. 19 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) :- सामाजिक न्याय भवनातून सामाजिक न्यायाची भावना वृद्धिंगत होण्यासाठीच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांना अभिप्रेत असा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ, कणखर आणि सदृढ महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारतरत्न डॉ. […]

अंतरराष्ट्रीय इतर गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी भारत जोडो यात्रेत भेट

गडचिरोली – देशाची एकता आणि अखंडतेचा संदेश घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते कश्मीर अशी साडेतीन हजार किलोमीटर पायी निघालेली पदयात्रा 7 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात दाखल झाली असून या यात्रेचे 17 नोव्हेंबर रोजी बाळापुर जिल्हा अकोला येथे आगमन झाले यादरम्यान गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे जिल्ह्यातील काँग्रेस नेते पदाधिकारी व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

मुंबई, दि. १७ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करण्याची मुदत २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आहे. इच्छुकांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबईचे संचालक डॉ. के.एस. जैन यांनी केले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

वस्तू व सेवाकर विभागाची पुण्यात मोठी कारवाई ; ६३० कोटींच्या बनावट पावत्यांद्वारे करचोरी करणाऱ्यास अटक

मुंबई, दि. 17 : राज्याच्या वस्तू व सेवाकर विभागाने विशेष तपास मोहिमेंतर्गत पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या तपास मोहिमेत एका व्यक्तीला 630 कोटी रुपयांच्या बनावट पावत्याद्वारे 110 कोटी रुपयांची बनावट कर क्रेडिट वापरुन पास केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती, राज्यकर सहआयुक्त, पुणे यांनी प्रसिद्ध‍ीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर विभागाने कर चुकविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात राबविण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अयोध्यानगरीत महाराष्ट्र भक्त निवासचे निर्माण व्हावे – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई दि. 17 : उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम मंदिराजवळ महाराष्ट्र भक्त निवास उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे अतिभव्य पुनर्निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत श्रीराम जन्मस्थळी दर्शनासाठी भाविक फार मोठ्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अतिवृष्टीमुळे बाधित औरंगाबाद, पुणे विभागातील शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा निर्णय

मुंबई, दि.17 : राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना प्रचलित दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत दुपट्टीने मदत देण्याचा राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला होता,  त्यानुसार औरंगाबाद आणि पुणे विभागासाठी १२८६ कोटी ७४ लाख ६६ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे लाखो बाधित […]