अंतरराष्ट्रीय इतर गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी भारत जोडो यात्रेत भेट

गडचिरोली – देशाची एकता आणि अखंडतेचा संदेश घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते कश्मीर अशी साडेतीन हजार किलोमीटर पायी निघालेली पदयात्रा 7 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात दाखल झाली असून या यात्रेचे 17 नोव्हेंबर रोजी बाळापुर जिल्हा अकोला येथे आगमन झाले यादरम्यान गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे जिल्ह्यातील काँग्रेस नेते पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांसह यात्रेत सहभागी झाले. या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी अनेक नागरिकांशी, पदाधिकाऱ्यांशी, विचारवंतांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडी अडचणी समजून घेत आहेत. यादरम्यान महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली व जिल्ह्यातील युवक, शेतकरी, महिला आणि सामान्य नागरिकांच्या समस्या संदर्भात चर्चा केले. सोबत जिल्ह्यातील रोजगाराचे प्रश्न, वाढती बेरोजगारी आणि महाराष्ट्र शासनाने 20 पेक्षा कमि पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार असल्याचे सांगितले याची दखल घेत राहुल गांधी यांनी 17 ताऱखीच्या पत्रकार परिषदेत या मुद्यावर हात घातला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले सह मोठ्या संख्येने नागरिक, काँग्रेस नेते पदाधिकारी यात्रेत सहभागी झाले होते.

राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या संघटनात्मक निवडणुकीच्या माध्यमातून सामान्यकाँग्रेस कार्यकर्ता युवक काँग्रेस चा अध्यक्ष झाला. व युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून पक्ष संघटना वाढीसाठी मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून काम केले त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टीकोण ठेवून कोरोना काळात जन सेवेचे उत्तम काम केले याचेच कौतुक म्हणून राहुल गांधी यांच्या हस्ते दिल्ली येथे महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा सत्कार करण्यात आला व पक्षाने विश्वास ठेवत त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी दिली. याबद्दल भेटी दरम्यान महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे आभार मानले. याला प्रतिक्रिया देत राहुल गांधी यांनी एकच नारा दिला “डरो मत”.