गडचिरोली :- राज्यातील “धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित/ विना अनुदानित/कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना” अल्पसंख्याक विकास विभागाच्या शासन निर्णय, दि.७.१०.२०१५ अन्वये राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता अनुदान मिळवू इच्छिणा-या अल्पसंख्याक बहूल शासनमान्य खाजगी शाळा; […]
राज्य
नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कारवाई करावी – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
शिवभोजन थाळीची गुणवत्ता तपासणीसाठी पथक तयार करणार शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ – छगन भुजबळ मुंबई, : शिवभोजन केंद्रांबाबतच्या तक्रारी लक्षात घेता नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. मंत्रालयातील दालनात शिवभोजन थाळी योजनेसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली […]
MHT CET २०२२ प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरु – MHT CET Online Registration
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी-२०२२ ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरीता उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज दि. १० फेब्रुवारी, २०२२ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. अर्ज सादर करण्याकरिता आणि अधिक माहितीसाठी राज्य […]
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन
मुंबई, दि. 10- भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, प्रधान सचिव तथा […]
पर्यावरणपूरक विचारांची पेरणी करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करूया – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 9 – पाणी, शेती, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, आपत्ती, महिला आणि हवामान बदल आदी विविध क्षेत्रांवर वातावरणीय बदलांचे परिणाम दिसून येत आहेत. यावरील उपाययोजनांबाबत पर्यावरणपूरक विचारांची ‘पेरणी’ करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. डॉ.गोऱ्हे यांच्या पुढाकाराने संपर्क आणि स्त्री आधार केंद्र संस्थांमार्फत आयोजित […]
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेला अद्ययावत माहिती मिळणार – मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई, दि. ९ : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नव्याने करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेला अद्ययावत माहिती मिळेल जनतेने संकेतस्थळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. मंत्री महोदय यांचे निवासस्थान सिंहगड येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाचे उद्घाटनप्रसंगी मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन […]
वृद्ध साहित्यिक व कलाकारांनी मानधन योजनेसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; कलाकार मानधन योजना
वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर मधील वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी मानधन मंजूर करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे. सन 2020-21 व 2021-22 या वर्षाकरीता राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन 1954-55 पासून […]
नागपूर विभागातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पशुधन विमा योजना पोहाेचवा – मंत्री सुनील केदार
नागपूर, दि. 7: अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत सर्वाधिक फटका बसतो तो शेतकऱ्यांच्या गुराढोरांना. त्यामुळे शासनाच्या पशुधन विमा योजनेचा लाभ प्रत्येक शेतकरी घेईल यासाठी प्रयत्न करावा. गुरे, शेळी- मेंढीपासून कोंबड्यांपर्यत सर्वांचाच विमा काढता येतो. सहज सुलभ असणारी ही योजना प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात माहिती झाली पाहिजे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रसिध्दी मोहीम राबवावी, असे निर्देश आज राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक […]
चंद्रपूर महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १२७ जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, चंद्रपूर (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या १२७ जागा संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा), इलेक्ट्रिशियन आणि वारयमन पदाच्या जागा अर्ज करण्याची तारीख – दिनांक ८ ते १८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
-शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या दिल्या सूचना- स्वर युगाचा अंत झाला मातृतुल्य आशीर्वाद हरपला मुंबई, दि.६ :- लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या […]