विश्वकर्मा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केली आहे. या योजनेला मंजुरी देखील देण्यात आली आहे. छोट्या व्यावसायिकांना योजनेद्वारे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी केवळ ५ टक्के एवढा व्याजदर असणार आहे. या योजना संदर्भातील खालील व्हिडीओ पहा. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत कोणाला होणार फायदा जे […]
राज्य
सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी! महाराष्ट्र शासनासकडून आरोग्य विभागात भरती जाहीर
अनेक काळापासून राज्यातील आरोग्य विभागातील विविध पदं मोठ्या प्रमाणावर रिक्त होती. त्यामुळे सरकारी रुग्णालयांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं होतं. पण आता या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागात 11 हजार पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यासंदर्भात उद्या जाहिरात निघणार आहे. तसेच ही भरती […]
परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
परभणी, दि.२७ (जिमाका) : परभणी जिल्ह्यात पायाभूत विकासाचे अनेक प्रश्न असून, ते सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. शहरात अमृत योजनेतून भुयारी गटार, काँक्रिटचे रस्ते, औद्योगिक वसाहत, नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना आदी कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मैदानावर आज शासन आपल्या दारी […]
राज्यात बांबू उत्पादन वाढ आणि त्याआधारित उद्योगाला प्रोत्साहन देणार : ना. सुधीर मुनगंटीवार
नागपुरातील बांबू “ऊती” टिश्यू कल्चर केंद्राचे ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन बांबू विकास मंडळाच्या बैठकीत घेतला सविस्तर आढावा नागपूर, दि.२७* :बांबू हा पर्यावरणरक्षक असून, बांबू उद्योगात असंख्य लोकांना रोजगार देण्याची क्षमता असल्याने राज्यात बांबू उत्पादन वाढीला प्रोत्साहन, त्यापासून तयार होणाऱ्या आकर्षक वस्तू, हस्तकला आणि फर्निचर ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी बांबू विकास मंडळाने नियोजन […]
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांचे हस्ते
गडचिरोली येथील गोंडवाना भवन येथे आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांचे हस्ते पार पडले, यावेळी मार्गदर्शन करतांना आपल्या न्याय हक्कांसाठी लढा देण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्याची गरज असून मोदी सरकारच्या खाजगीकरण धोरणाविरुद्ध सुद्धा आवाज उठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. किरसान यांनी केले. […]
जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि.26: जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरूनजपान दौऱ्यावर गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत आगमन झाले. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आगमनानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जपानच्या या दौऱ्यात जपान सरकारचे मंत्री, पंतप्रधानाचे सल्लागार, विविध कंपन्या, अधिकारी,प्रांतांचे गव्हर्नर, कंपन्या, एंजन्सी यांच्यासोबत आपण […]
व्यावसायिकांनी व्यापक समाज हितासाठी कार्य करावे : राज्यपाल रमेश बैस
‘तेरापंथ प्रोफेशनल फोरम’ या संस्थेतर्फे ‘लघुतेकडून प्रभुतेकडे’ या विषयावरील १६ वे राष्ट्रीय अधिवेशन मुंबई दि.26: जैन तेरापंथ समाजातील व्यावसायिकांनी आपल्या समाजातील युवकांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेले आयएएस स्पर्धा प्रशिक्षण वर्ग तसेच इतर उपक्रमांचा लाभ सर्वच समाजांमधील युवकांना करुन द्यावा असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. व्यापक समाज हितासाठी कार्य केल्यास ते ‘लघुतेकडून प्रभुतेकडे’ […]
राज्यात येत्या काही दिवसात पडणार हलका पाऊस – हवामान विभागाचा अंदाज जारी
वामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांत राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.
क्रीडा क्षेत्रात युवकांनी आपले नावलौकिक करावे व आपलं करीयर बनवावे-माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम
भवानीपुर येथे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न..!! स्थानिक मूलचेरा तालुक्यातील सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भवानीपुर येथे स्व.जगदिश ढाली यांच्या स्मृति प्रित्यर्थ दरवर्षी भव्य फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येते. मोठ्या उत्साहात स्पर्धक या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होतात. या फूटबॉल स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे होते, अध्यक्षीय भाषणात […]
सहा महिन्यांत कायमस्वरूपी पुनर्वसन करणार : इरशाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा
मुंबई, दि. १५ : इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इरशाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. त्यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना धीर दिला..शासन भक्कमपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यांत होईल, असा विश्वास स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने यावेळी दिला! दिवसभरातील स्वातंत्र्य […]