मुंबई, दि. २७ : राज्यातील विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अधिवेशनाला पुढील आठवड्यात सोमवार (दि. ३१ जुलै) आणि (दि. १ ऑगस्ट २०२३) रोजी सुट्टी राहिल. त्यानंतर दि. २, ३ व ४ ऑगस्ट २०२३ रोजी विधिमंडळाचे कामकाज नियमितपणे होईल. विधानभवन येथे, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकींमध्ये हा निर्णय घेण्यात […]
राज्य
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण
मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांच्या २०० कार्यकर्ते यांचा भाजप पक्ष प्रवेश मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते 206 शालेय विद्यार्थीना सायलक वाटप गडचिरोली- जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यात काल माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे दौऱ्यावर आले असता तेथील कार्यकर्ते व स्थानिक गावकऱ्यांनी त्यांचा मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात जंग्गी […]
नोंदणी असलेल्या कामगारांनाच मोफत भोजन – कामगार मंत्री सुरेश खाडे
मुंबई : इमारत व इतर बांधकाम व्यवसायामधील बांधकाम कामगारांसाठी, १ जुलै 2023 पासून नोंदणी असलेल्या कामगारांनाच मोफत जेवण वितरित करण्यात येते, असे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत सांगितले. इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे इमारत व इतर बांधकाम व्यवसायामधील बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत लक्षवेधी विधानपरिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी मांडली. त्याला उत्तर देताना […]
आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई : आयुर्वेद क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सकारात्मक प्रयत्न करणार. शासकीय, शासन अनुदानित व खासगी विनाअनुदानित आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तत्काळ भरणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली. राज्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत सदस्य सचिन अहीर यांनी लक्षवेधी मांडली. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील विविध आयुर्वेद […]
समाज माध्यमातून आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : समाज माध्यमातून महामानवांबाबत आक्षेपार्ह लिखाण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी राज्य शासन लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ व ‘हिंदू पोस्ट’ ही संकेतस्थळे तत्काळ बंद करून संकेतस्थळ चालविणाऱ्या व लिखाण प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल […]
सिंदेवाही व सावली ग्रामीण रूग्णालयासाठी 76 कोटींचा निधी मंजूर- माजी मंत्री व विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश
ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही व सावली तालुक्यातील ग्रामीण नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा ब्रम्हपुरी क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशनात सिंदेवाही व सावली येथील ग्रामीण रुग्णालयात आयसीयू बेड सह इतर मूलभूत तसेच अद्यावत आरोग्य सेवा मिळावी या उदांत हेतूने सभागृहात मागणी रेटून धरल्याने […]
आलापल्ली वासियांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड- मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश
अहेरी- कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश आले असून तालुक्यातील आलापल्ली वासीयांना आता मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आलापल्ली येथील ग्रामवासियांकडे मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रॉपर्टी कार्ड मिळावा यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. मात्र ते शक्य झाले नाही. धर्मराव बाबा आत्राम आमदार […]
शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोलीत येणार
शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी “शासन आपल्या दारी” उपक्रमातून 6.97 लक्ष नागरिकांना विविध योजना व सेवांचा लाभ वितरीत गडचिरोली, दि.06 : गडचिरोली जिल्हयात आत्तापर्यंत झालेल्या “शासन आपल्या दारी” उपक्रमातून 6.97 लक्ष नागरिकांना विविध योजना तसेच दाखले दिले आहेत. या उपक्रमातील जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी उपक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित […]
गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांचा वाढदिवस मूलचेरा ग्रामीण रुग्णालयात बिस्कीट व फळ वाटप करून साजरा करण्यात आला
मूलचेरा:- गडचिरोली जिल्हापरिषद माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कांकडलवार यांनी आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात किंबहुना अहेरी उपविभागात खऱ्या अर्थाने विकासाची मशाल पेटवली.या आधीच्या ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य,जिल्हापरिषद सदस्य,सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष हे पदे भूषविली आपल्या कारकिर्दीत शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना व सोयी सुविधा पुरविण्याचे कार्य त्यांनी केले.माजी जिल्हापरिषद अध्यक्ष […]
मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची – राष्ट्रपती मुर्मू
गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण गडचिरोली, दि. ५: देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले. गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभ व अडपल्ली येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारतीच्या कोनशिला समारंभास राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या […]