मुलचेरा: राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजने’ अंतर्गत पात्र लाभार्थी कुटूंबांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असल्याने संबंधीत लाभार्थींनी आपल्या गॅस एजंन्सीमध्ये संपर्क करावा, तसेच योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन तहसिलदार चेतन पाटील […]
विदर्भ
या लोकांचं रेशन कार्ड कायम स्वरूपी बंद होणार : श्री लोमेश उसेंडी प्रभारी तहसीलदार मुलचेरा
मुलचेरा:- रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने नियमावली बनवली आहे. त्या नियमांचे तुम्ही पालन न केल्यास तुमचे राशन कार्ड बंद होणार आहे. जे नागरिक पात्र नसतानाही शासनाच्या या योजनेचा लाभ घेत आहेत अशा नागरिकांसाठी आता सरकारने रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात अनेक जणांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील तरतुदीनुसार […]
रानभाजी विक्रीतून रोजगार निर्मिती करणे शक्य. – श्री. लोमेश उसेंडी साहेब, प्रभारी तहसीलदार,मुलचेरा
मुलचेरा:- कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व उमेद मुलचेरा यांचे संयुक्त विदयमानाने “ ९ ऑगष्ट जागतिक आदिवासी दिनाच्या “ निमित्ताने आज दिनांक १२/०८/२०२४ रोजी तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन तहसील कार्यालय सभागृह मुलचेरा येथे करण्यात आले. कार्यक्रमाला मा. श्री. बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा, गडचिरोली , मा. श्री. […]
प्रबोधी वेस्कडे सेट परीक्षा उत्तीर्ण
यूजीसी दिल्ली व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे द्वारा घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला .या परीक्षेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील पदव्युत्तर इंग्रजी विभागाची विद्यार्थीनी प्रबोधी हिराचंद वेस्कडे हिने इंग्रजी विषयात सेट (महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर असिस्टंट प्रोफेसर) पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील […]
महसूल पंधरवाड्यातील सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम तहसील कार्यालय मुलचेरा येथे संपन्न
मुलचेरा-: दिनांक 1 आगस्ट पासून सुरु झालेल्या महसूल पंधरवाडा कार्यक्रम अंतर्गत *सैनिक हो तुमच्यासाठी*हा विशेष उपक्रम मुलचेऱ्याचे प्रभारी तहसीलदार लोमेश उसेंडी यांच्या अध्यक्षतेखली तहसील कार्यालयात दिनांक 10 आगस्ट ला आयोजीत करण्यात आला होता. प्रभारी तहसीलदार लोमेश उसेंडी यांचे हस्ते तालुक्यातील माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.देशाच्या रक्षणासाठी, आपल्या […]
उपपोलीस स्टेशन झिंगानूर येथे भव्य जनजागरण मेळावा संपन्न
उपपोलीस स्टेशन झिंगानूर येथे भव्य जनजागरण मेळावा संपन्न जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून गडचिरोली चे पोलीस अधीक्षक निलोत्पल सा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन ) कुमार चिंता सा. अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान ) यतिश देशमुख सा अप्पर पोलीस अधीक्षक रमेश सर (अहेरी ) उपविभागिय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक सा […]
मूलचेऱ्यात सुरु झाले गोष्टीरूप महसूल वाचनालय. तहसील कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम
मुलचेरा-: बऱ्याचदा महसूल विषयक कामकाजाविषयी माहिती नसल्यामुळे शेतजमिनविषयक कामकाजत नागरिकांना नाहक त्रास उद्भवत असतो. परिणामी जमीन खरेदी विक्री प्रकरण असो किंवा जमिनीबाबत इतर विषय असोत,नागरिकांना असलेल्या माहितीच्या अभावी बरेचशे प्रकरणे न्यायालयापर्यंत जात असतात. नागरिकांना महसूली व्यवहाराची अगदी सोप्या भाषेत माहिती व्हावी या हेतूने माजी सेवानिवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड (भा.प्र.से) यांच्या संकलपनेतून साकर झालेले, संजय […]
तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी शेतात जाऊन धान पिकाची पट्टा पद्धतीने केली रोवणी
मुलचेरा: चक्क गोमनी येथील माधव वारलू दिवटीवार यांच्या धानाच्या शेतात तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी हजेरी लावली.यावेळी त्यांच्या हस्ते ‘ पट्टा’ पद्धतीने धान पिकाची लागवड करण्यात आली. धान पिकाची पट्टा पद्धतीने लागवड केल्याने फायदे होतात याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी भात लागवडीने वेग धरला आहे. कृषी […]
तहसिलदारांच्या प्रयत्नामुळे झाड पडून बंद झालेला देवदा -रेगडी रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत चालू.
मुलचेरा- मागील दोन दिवसापासून तालुक्यात चालू असलेल्या सततधांर पाऊसामुळे दिनांक 21जुलै ला देवदा- रेगडी मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड पडून वाहतूक काही काळासाठी प्रभावित झाली होती. ही बाब आपल्या महसूल विभागाच्या पथकासोबत अतिवृष्टिग्रस्त भागात दौऱ्यावर असलेल्या मुलचेऱ्याचे तहसिलदर चेतन पाटील यांना कळताचं त्यांनी तात्काळ आपल्या महसूल विभागाचे पथक व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने झाड बाजूला हटवून […]
रेगडी धरण परिसरात पर्यटकांनी खबरदारी बाळगावी तहसिलदार चेतन पाटील
मुलचेरा- मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात चालू असलेल्या सततधांर पाऊसामुळे कन्नमवार जलाशय ( रेगडी धरण) हे पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्या धरणाच्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे आलेल्या पर्यटकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी धरण परिसरात फिरताना खबरदारी घ्यावी तसेच पाण्याच्या प्रवाहात आणी सांडव्यावरून जाण्यास प्रशासनातर्फे प्रतिबंध करण्यात आलेला असल्यामुळे सर्व नागरिकांनी उचित ती खबरदारी घेण्याचे […]