अहेरी:-स्थानिक नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १६ मध्ये विविध विकास कामे होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते नुकतेच विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांची मागील काही दिवसांपासून आपल्या प्रभागात बुद्ध विहार,सभा मंडप तसेच आदी विकास काम करण्याची मागणी होती.त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांनी मंत्री […]
विदर्भ
विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प आज शासनाने सादर केला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प सर्वच घटकांचा विचार करणारा तसेच राज्याच्या समतोल विकासाचा आहे. सबका साथ सबका विकास या मंत्रावर आधारित या अर्थसंकल्पाने शेतकरी, महिला, […]
१ ते ३ मार्च या कालावधीत ताडोबा महोत्सव; वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत पर्यटनासाठी महोत्सवाचे आयोजन – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 26 : वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एकाच दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्व विक्रम प्रस्थापित केला जाणार असल्याचे […]
५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार – मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. २६ : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे १ एप्रिल २०२२ पासूनच्या सुमारे ५ हजार ६०५ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये १ लाख पर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये ७५ हजार पर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती […]
मंत्रिमंडळ निर्णय
धान उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर रक्कम धान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी 20 हजार रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे खरीप हंगामासाठी 1600 कोटी रुपये खर्च येईल. धनगर विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षण विद्यार्थी संख्या वाढविली धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवास शाळांमध्ये शिक्षण […]
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असून त्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.२५ : मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून इतर मागास वर्ग (ओबीसी) अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.कायदा कोणीही हातात घेवू नये.कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असून यासाठी शासन कटिबद्ध असल्याने मुख्यमंत्री एकनाथ […]
कोताकोंडा येथे एकाच मैदानात कबड्डी व व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन
माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते उदघाटन एटापल्ली:- तालुक्यातील कोत्ताकोंडा (बु) येथे कोंडागड क्लब तर्फे भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे उदघाटन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी सहउदघाटक म्हणून गाव पाटील लक्ष्मण इष्टाम,स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून गंगाराम इष्टाम,उपाध्यक्ष लालूजी उसेंडी,राकॉचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत […]
अव्वल शैक्षणिक संस्थासह मानवी संसाधनाचेही सर्वोत्तम केंद्र म्हणून विकसित करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 24 : अखिल भारतीय पातळीवरील नावाजलेल्या सर्व क्षेत्रातील संस्था नागपुरात याव्यात, इथल्या गुणवंताना अशा संस्थामधून संधी मिळावी यासाठी सुरुवातीपासून आमची आग्रही भूमिका राहिली आहे. याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भक्कम साथ दिली. या प्रयत्नातून नागपूर येथे एम्स, भारतीय तंत्रज्ञान संस्थान, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसारख्या संस्था इथे साकारता आल्या. यातील […]
राज्यातील विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे प्रधानमंत्र्यांच्या
मुंबई, दि. २४: सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे राज्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. या प्रकल्पांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी, दि. २५ फेब्रुवारी रोजी दुरदृष्य प्रणालीद्वारे विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य व कुटुंब […]
मतदार जनजागृती रॅलीने गडचिरोली शहर दुमदुमले
गडचिरोली दि.२४ : जिल्हा निवडणूक अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग आणि फुले-आंबेडकर कालेज ऑफ सोशल वर्कच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीसाठी गडचिरोली शहरात मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली शहरात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आज सकाळी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची […]