ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘स्मार्ट’ प्रकल्प कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट मुंबई, दि. 24 : ‘स्मार्ट’ प्रकल्प हा राज्यातील कृषि क्षेत्रासाठी गेम चेंजर असणार आहे. या प्रकल्पादरम्यान विकसित होणाऱ्या लिंकेजेसमुळे शेती आणि शेतकरी अधिक समृद्ध होणार आहे. राज्यातील कृषिक्षेत्र वातावरणीय बदलांना अनुकूल करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे तानो कौमे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करुन प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

क्रेडाई नाशिक मेट्रो शेल्टर २०२२ रिअल इस्टेट एक्स्पोचा शुभारंभ नाशिक, दि.24 (जिमाका वृत्तसेवा) – केंद्र आणि राज्य शासन परवडणाऱ्या घरांसाठी ग्रामीण व शहरी भागात घरकुलाच्या योजना राबवित आहे. शासनाप्रमाणेच खाजगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी सामाजाचे आपण देणं लागतो या भावनेतून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एक्स्पोच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्याच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ७ हजार ९०९ पशुपालकांच्या खात्यावर २० कोटी रुपये जमा – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

मुंबई, दि. २४ : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा ७ हजार ९०९ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २०.१२ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री. सिंह म्हणाले की, राज्यामध्ये दि. 24 नोव्हेंबर 2022 अखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3741 संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

एमएडीसी आणि एमआयडीसीमार्फत विमानतळांचा विकास करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (MADC) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्यामार्फत संयुक्तरित्या विमानतळांचा विकास करावा. पुरंदर विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने तातडीने जागेचे अधिग्रहण करावे; याचबरोबर अमरावती येथील बेलोरा विमानतळावर रात्री विमान उतरण्याची सुविधा तत्काळ सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्यातील विविध विमानतळांच्या कामकाजासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सर्वसामान्यांचा गृहप्रवेश प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमृत महाआवास अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ राज्यात ५ लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई, दि. 24 : सन 2024 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट असून आता ‘अमृत महाआवास योजना’ 2022 – 23 अभियानातील 5 लाख घरे पुढील 100 दिवसात बांधण्यात येणार आहेत. विक्रमी वेळेत घरकुले बांधली जाणार असून प्रधानमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

संविधान दिनानिमित्त २५ व २६ नोव्हेंबरला ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ई. झेड. खोब्रागडे यांचे व्याख्यान

मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात संविधान दिनानिमित्त भारतीय राज्य घटनेचे अभ्यासक तसेच निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे माहितीपर व्याख्यान राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या ॲपवर शुक्रवार दि. 25 व शनिवार दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ऐरोली येथे मराठी भाषा उपकेंद्राचे लवकरच भूमिपूजन – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई दि. 24 : चर्नी रोड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाचे काम तातडीने सुरु करण्याचे निर्देश विभागाला दिले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन ऐरोली येथील उपकेंद्राचे भूमिपूजनही लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मराठी भाषा भवन उभारणीसंदर्भात माहिती देण्यासाठी मंत्रालयात आज पत्रकार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कृषी योजनांच्या केंद्राकडील निधीसाठी भरीव पाठपुरावा करावा – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. 24 : कृषी विभागाच्या ज्या योजना केंद्र सरकारच्या अर्थसाह्याने राबविण्यात येतात, अशा योजनांसाठी निधी वेळेत मिळण्यासाठी भरीव पाठपुरावा करावा, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्री श्री. सत्तार यांच्या दालनात आज कृषी विभागाच्या विविध योजनांची सद्यस्थिती आणि प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहसचिव […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सोयाबीन-कापसाचा बाजारभाव स्थिर राहण्यासाठी केंद्राशी चर्चा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 24 : सोयाबीन-कापूस पिकाच्या बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भातील धोरणात बदल करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर व त्यांच्या शेतकरी शिष्टमंडळाने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विद्यापीठांनी आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना मांडून भारताला सशक्त करण्यासाठी मोठे अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल म्हणून या अभियानाला चालना देण्यासाठी विद्यापीठाने आत्मनिर्भर विद्यापीठ होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची […]